बडगाम : शहीद झालेल्या पायलटचे मामासुद्धा असेच झाले होते शहीद, पत्नीही आहे हवाई दलात

सिद्धार्थची पत्नी भारतीय हवाई दलात पायलट असून ती जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 28, 2019 02:32 PM IST

बडगाम : शहीद झालेल्या पायलटचे मामासुद्धा असेच झाले होते शहीद, पत्नीही आहे हवाई दलात

जम्मू काश्मीरमध्ये बडगाम इथं भारतीय हवाई दलाचं एमआय 7 हेलिकॉप्टर दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. यात हरियाणातील दोन वैमानिकांचा समावेश आहे.

झज्जर येथील विक्रांत सिंह आणि दूसरा वैमानिक सिद्धार्थ शर्मा अंबाला जिल्ह्यातील हमीदपूरचे आहेत.

सिद्धार्थ यांनी 1 हजार तासांपेक्षा जास्त काळ उड्डाण करून विक्रम केला आहे.  पंतप्रधान मोदी, लष्करप्रमुख यांना घेऊनही सिद्धार्थ शर्मा यांनी उड्डाण केले होते.

Loading...

विमान दुर्घटनेत सिद्धार्थचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती अद्याप हवाई दलाकडून मिळाली नसून आम्ही त्यांच्याकडून प्रतिसादाची वाट पाहतो आहे असं सिद्धार्थच्या वडिलांनी म्हटलं आहे. विमान दुर्घटनेत सिद्धार्थचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती अद्याप हवाई दलाकडून मिळाली नसून आम्ही त्यांच्याकडून प्रतिसादाची वाट पाहतो आहे असं सिद्धार्थच्या वडिलांनी म्हटलं आहे.

विमान दुर्घटनेत सिद्धार्थचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती अद्याप हवाई दलाकडून मिळाली नसून आम्ही त्यांच्याकडून प्रतिसादाची वाट पाहतो आहे असं सिद्धार्थच्या वडिलांनी म्हटलं आहे.

17 वर्षांपूर्वी 25 फेब्रुवारी 2002 ला सिद्धार्थचे मामा फ्लाईट लेफ्टनंतर विनीत भारद्वाज हे देखील विमान दुर्घटनेत शहीद झाले होते.

सिद्धार्थने त्याचं शालेय शिक्षण चंदिगढमधील शिवालिक पब्लिक स्कूल मधून केले. त्यानंतर DAV कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 2010 मध्ये भारतीय हवाई दलात रुजू झाला होता.

2013 मध्ये सिद्धार्थ आणि आरती यांचे लग्न झाले. भारतीय हवाई दलात कार्यरत असलेल्या आरती या देखील जम्मू काश्मीरमध्ये सेबा बजावत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून शहीद सिद्धार्थ शर्मा त्यांच्या कुटुंबासोबत चंदिगढमध्ये राहत होते. सिद्धार्थ यांची पत्नी आरती या देखील भारतीय हवाई दलात स्क्वाड्रन लीडर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन वर्षांचा अंगद नावाचा मुलगा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 08:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...