Elec-widget

या सुखोई विमानांनी परतवला पाकचा क्षेपणास्त्र हल्ला : हवाईदलानं दिलं अधिकृत निवेदन

या सुखोई विमानांनी परतवला पाकचा क्षेपणास्त्र हल्ला : हवाईदलानं दिलं अधिकृत निवेदन

पाकिस्तान दलाच्या विमानाविरोधातल्या कारवाईचे तपशील भारतीय हवाईदलाच्या वतीने अधिकृत निवेदनात देण्यात आले आहेत. भारताचं सुखोई पाडल्याचा पाकिस्तानचा दावा हा त्यांचं अपयश लपवण्यासाठी रचलेला कांगावा असल्याचा स्पष्ट उल्लेख या निवेदनात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 मार्च : पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय तळांवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती. पण दक्ष असलेल्या भारतीय सेनेनं त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ दिले नाहीत. पाकिस्तान दलाच्या विमानाविरोधातल्या कारवाईचे तपशील भारतीय हवाईदलाच्या वतीने अधिकृत निवेदनात देण्यात आले आहेत.

भारतीय हवाईदलाने मिराज 2000, Su-30 आणि मिग -21 बायसन या लढाऊ विमानांसह हा हल्ला परतवून लावला. भारताच्या या तयारीने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानला भारतीय हद्दीतून तत्काळ काढता पाय घ्यावा लागला. परतताना त्यांची झालेली घाई भारतीय हद्दीत सापडलेल्या मिसाईल्सच्या तुकड्यांवरून दिसून येते. त्यांची परतताना घाई झाली असावी, म्हणूनच त्यांचं लक्ष्य चुकलं आणि अॅमराम मिसाईल भरकटलं, असं हवाई दलाने निवेदनात म्हटलं आहे.

या लढाईत पाकिस्तानी हवाई दलाने F16 लढाऊ विमानाच्या साहाय्याने एकापेक्षा जास्त अॅमराम मिसाईल्स डागली हे इथे सापडलेल्या पुराव्यांतून स्पष्ट झालं आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे. सुखोई 30 च्या मदतीने वेळीच केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे हा मिसाईल हल्ला परतवून लावण्यात आला. या मिसाईल्सचे तुकडे राजौरीजवळ सापडले होते. यामुळे गावातली एक व्यक्ती जखमी झाल्याचं हवाईदलातर्फे सांगण्यात आलं.

प्रतिहल्ल्यात वापरलेली सर्व सुखोई 30 विमानं सुखरूप परत आली आहेत. भारताचं सुखोई पाडल्याचा पाकिस्तानचा दावा हा त्यांचं अपयश लपवण्यासाठी रचलेला कांगावा असल्याचा स्पष्ट उल्लेख या निवेदनात आहे.

28 फेब्रुवारीला भारतीय सैन्यदलातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अॅमराम क्षेपणास्त्राचे पुरावे दाखवण्यात आले होते.

Loading...

28 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत काय दाखवलं?

भारत आणि पाकिस्तानातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर, नौदल आणि हवाईदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. पाकिस्तानचा लष्करी तळांवर हल्ला करण्याचाच इरादा होता, हे सिद्ध करणारे पुरावे या पत्रकार परिषदेनंतर दाखवण्यात आले.

एअर व्हाईस चीफ मार्शल आर. जी. के. कपूर यांनी यासंदर्भात विचारलेल्या माहितीवर सांगितलं की, पाकिस्तानने आमच्या आस्थापनांवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती, याचे पुरावे आहेत. F16 हे विमान एअर टू एअर मिसाईल्ससाठीच वापरलं जातं. या लढाऊ विमानाचे तुकडे भारताच्या हद्दीत पूर्व राजौरीजवळ सापडले आहेत. याचा अर्थ उघड आहे. पाकिस्तानी हवाई दल मोठं लक्ष्य घेऊन भारतीय हद्दीत आलेलं होतं, असं ते म्हणाले.

अॅमराम मिसाईल्स वापरल्याचे पुरावे या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. ही मिसाईल्स भारताच्या लष्करी आस्थापनांविरोधातच वापरण्याचा पाकिस्तानचा इरादा होता. पण भारतीय सैन्यदलांच्या दक्षतेमुळे त्यांचे प्रयत्न हाणून पाडले गेले, असं भारतीय सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी सांगितलं.

"पाकिस्तानने वेळोवेळी आपलं निवेदन बदललं. सुरुवातीला त्यांनी 2 भारतीय विमानं पाडल्याचं सांगत 2 वैमानिक ताब्यात असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर संध्याकाळी निवेदन फिरवून एकच पायलट ताब्यात असल्याचं सांगितलं", असं एअर व्हाइस मार्शल कपूर म्हणाले.

"भारताने 26 फेब्रुवारीला पहाटे ठरवलेलं लक्ष्य साधलं आणि मोहीम फत्ते केली. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. पण ते कधी आणि कसे सादर करायचे याचा निर्णय भारत सरकारमधली उच्चपदस्थांचा आहे", असंही कपूर म्हणाले.

पाकिस्तानने त्यांच्या ताफ्यातलं F16 लढाऊ विमान भारताविरोधात वापरलं याचे पुरावे दर्शवताना एअरफोर्सचे अधिकारी म्हणाले, "एअर टू एअर मिसाईल वाहून नेण्यासाठीचं हे एकच एअरक्राफ्ट आहे. प्रत्येक लढाऊ विमान हद्दीत प्रवेश करतं तेव्हा त्यांना ओळखायची यंत्रणा आमच्याकडे असते. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असलेले पुरावे आमच्याकडे आहेत. या पुराव्यांमधून पाकिस्तानी सैन्याचा उद्देश स्पष्ट होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 09:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...