वायुदलाचे मार्शल अर्जन सिंग अत्यवस्थ, पंतप्रधानांनी घेतली रुग्णालयात भेट

वायुदलाचे मार्शल अर्जन सिंग अत्यवस्थ, पंतप्रधानांनी घेतली रुग्णालयात भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी रुग्णालयाला भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चा केली.

  • Share this:

16 सप्टेंबर : भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंग अत्यवस्थ आहे. त्यांना दिल्लीतल्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात भरती करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी रुग्णालयाला भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चा केली.

आज सकाळी मार्शल अर्जन सिंह यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल अशी माहिती संरक्षण मंत्री निर्मला सितारनमन यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांनी आर्मी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात अशी प्रार्थना मोदींनी केलीये.

अर्जन सिंग यांना वायुदलाकडून मार्शल ही पदवी दिली गेलीये. ही पदवी निवृत्तीनंतरही राहतं. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या पदासारखंच हे पद आहे. अर्जन सिंह हे १९६९ साली वायुदलातून निवृत्त झाले. १९६५ च्या युद्धातल्या कामगिरीसाठी त्यांना पद्म विभूषण दिलं गेलं होतं.

First published: September 16, 2017, 7:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading