आता राजस्थान सीमेजवळ घुसलं पाकिस्तानी ड्रोन, भारतीय वायुदलाने पाडलं

भारतीय वायुदलाच्या सुखोई लढाऊन विमानातून मिसाईल सोडून त्याला खाली पाडण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रोन सारखं दिसणारं हे मानव रहित विमान पाकिस्तानच्या फोर्ट अब्बास परिसरात कोसळलं.

News18 Lokmat | Updated On: Mar 4, 2019 08:05 PM IST

आता राजस्थान सीमेजवळ घुसलं पाकिस्तानी ड्रोन, भारतीय वायुदलाने पाडलं

जयपूर, 04 मार्च : पाकिस्तानकडून सोमवारी पुन्हा एकदा भारतीय वायु क्षेत्रामध्ये घुसखोरी करण्यात आली आहे. सकाळी 11:30 च्या सुमारास राजस्थान सीमेजवळ एक अज्ञात विमान उडताना दिसलं. याची माहिती मिळताच भारतीय वायुदलाकडून हे विमान पाडण्यात आलं.

भारतीय वायुदलाच्या सुखोई लढाऊन विमानातून मिसाईल सोडून त्याला खाली पाडण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रोन सारखं दिसणारं हे मानवरहित विमान पाकिस्तानच्या फोर्ट अब्बास परिसरात कोसळलं. जे बाहवलपूरजवळ आहे. या कोसळल्या विमानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ट्विटवर ट्वीट करण्यात आले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानच्या अनुपगड सेक्टरमध्ये सकाळी 11:30 च्या सुमारास एअर डिफेंस रडारवर एक युएव्ही म्हणजेच (Unmanned aerial vehicle)फिरत असल्याची माहिती भारतीय वायुदलाच्या हाती लागली. यानंतर सुरतगड एअरबेसवरून सुखोई लढाऊ विमानाने या युएव्हीवर मिसाईल डागण्यात आलं आणि या युएव्हीला संपवण्यात आलं. त्यानंतर हे युएव्ही पाकिस्तान सीमेवर कोसळलं.Air Strikeमध्ये किती दहशतवादी मेले ते मोजणं आमचं काम नाही - वायुदल प्रमुख

भारतीय वायुदलानं पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि शेजारील देश वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. Air Strike वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना भारतीय वायुदलाचे प्रमुख बी.एस.धानोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. ' एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले, त्याची संख्या मोजणे वायुदलाचे काम नाही. आम्हाला जे टार्गेट दिले होतं, ते आम्ही पूर्ण केलं', असं बी.एस. धनोआ यांनी सांगितलं.

यावेळेस वायुदल प्रमख धानोआ यांनी पाकिस्तानला थेट इशारा देत म्हटलं की, 'कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देताना वायुदल क्षणाचाही विचार करणार नाही. गरज भासल्यास भारतीय वायुदल पुन्हा पाकिस्तानात घुसून कारवाई करेल. तसंच बॉम्ब जंगलात पडले नसते, तर पाकिस्तानने प्रतिहल्ला केला नसता.'

'हल्ल्यासाठी अपग्रेडेड मिग 21 विमान वापरलं'

वायुदल प्रमुख धनोआ यांनी पुढे असंही सांगितलं की, एअर स्ट्राईकदरम्यान वापरण्यात आलेलं मिग 21 हे अपग्रेडेड विमान होतं आणि शत्रू देशाला प्रत्युत्तर देण्याच्या वेळेस आमच्याकडे जे विमान उपलब्ध असेल, त्यावेळेस त्याचा वापर केला जाईल.

'पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावे'

भारतावर हल्ला करताना पाकिस्ताननं F-16 विमानांचा वापर केला. याचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, या विमानाचे काही तुकडे आमच्याकडे आहेत, असे सांगत धानोआ यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर आणला.

'अभिनंदन यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत'

वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. जोपर्यंत ते ठीक होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू राहतील. अभिनंदन सर्वच चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्यास ते लवकरच आपल्या पदावर पुन्हा रूजू होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...