VIDEO लढाऊ विमानाला पक्षाची धडक, धाडसी पायलटने असं उतरवलं विमान

विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच विमानाला पक्षाची धडक बसली. यात विमानाचं एक इंजिन बंद झालं.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 10:15 PM IST

VIDEO लढाऊ विमानाला पक्षाची धडक, धाडसी पायलटने असं उतरवलं विमान

अंबाला 28 जून :  हवाई दलात लढाऊ विमान चालवणं हे सर्वात आव्हानात्मक काम असतं. एकग्रता आणि अचूक निर्णयक्षमता याची कसोटी यात लागत असते. याचाच अनुभव आज हवाई दलाच्या एका पायलटला आला आणि त्यात तो उत्तम मार्काने पासही झाला. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये विमानाला पक्षाची धडक बसली. धोका लक्षात घेऊन पायलटने विमानाला लावलेल्या दोन इंधन टाक्या खाली सोडल्या आणि विमान सुखरूप लँड केलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

गुरुवारी म्हणजे 27 जूनच्या सकाळची ही घटना आहे. पंजाबमधल्या अंबाला इथल्या एअर बेसवरून जग्वार या विमानाने सरावासाठी उड्डाण घेतलं. या विमानाला दोन इंधन टाक्या जोडल्या होत्या. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच विमानाला पक्षाची धडक बसली. यात विमानाचं एक इंजिन बंद झालं. अशा स्थितीत दोन इंधन टाक्या घेऊन जाणं हे अत्यंत जोखमीचं काम होतं.

त्यामुळे वैमानिकाने क्षणचाही विलंब न लावता त्या टाक्या काही क्षणातच विमानापासून वेगळ्या केल्या आणि त्या टाक्या खाली पडल्यानंतर त्याचा स्फोटही झाला. मात्र विमान सुखरुप लँड झालं. इंधनाच्या टाक्यांचं मोठं वजन असतं. हवेतल्या हवेत इंधन भरण्यासाठी या टाक्यांचा वापर केला जातो. विमानाला या टाक्या जोडण्याची खास सोय केलेली असते. इंधन टाक्यांबरोबरच या विमानाला बॉम्ब वाहून नेण्याचे कॅरिअर्सही जोडलेले होते.

Loading...

आणीबाणीच्या प्रसंगात या टाक्या विमानापासून अलग करण्याचीही सोय असते. विमानाचं एक इंजिन बंद पडल्याने विमानाला या टाक्यांचं ओझं पेलवलं नसतं. अशा स्थितीत विमानाला अपघात होण्याची शक्यता असते. अशा कुठल्याही परिस्थितीत सगळ्यात महत्त्व असतं ते पायलटचा जीव वाचणं. तशा प्रकारचं प्रशिक्षण त्याला दिलं जातं.

या घटनेत पायलटने आपल्या कौशल्याचं दर्शन घडवत जीव तर वाचवलाच त्याच बरोबर विमानही सुखरुप घाली आणलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2019 10:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...