Home /News /national /

BREAKING : IAF च्या लढाऊ विमानाला अपघात, दुर्घटनेमध्ये पायलटचा जीव वाचला

BREAKING : IAF च्या लढाऊ विमानाला अपघात, दुर्घटनेमध्ये पायलटचा जीव वाचला

पंजाबमध्ये एका IAFच्या लढाऊ विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

    पंजाब, 08 मे : पंजाबमध्ये एक IAF लढाऊ विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात विमानाच्या पायलटचा जीव वाचला आहे. नवाशहर जिल्ह्यातील रुडकी कलां या गावाजवळ भारतीय हवाई दलाच्या मिग-29 या लढाऊ विमानाचा अपघात झाला. होशियारपूरच्या एसएसपी यांनी यासंदर्भात माहिती दिली. एसएसपी गौरव गर्ग यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटना घडलेल्या विमानातून पायलटला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या पायलटला तपासणीसाठी होशियारपूरमधील जवळच्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. शुक्रवारी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी  जालंधरजवळील हवाई दलाच्या एका मिग-29 या विमानाचा प्रशिक्षणादरम्यान अपघात झाला. काही तांत्रिक अडचणीमुळे विमानातील पायलटला ते नियंत्रणात आणणे शक्य होत नसल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान या अपघातातून पायलटला वाचवण्यात यश मिळाले आहे. दरम्यान या अपघाताचे नेमके कारण काय होते याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या