पाकचा खोटारडेपणा उघड, F-16 पाडल्याचे भारताकडे पुरावे!

पाकचा खोटारडेपणा उघड, F-16 पाडल्याचे भारताकडे पुरावे!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील F-16 विमान पाडण्यावरून सुरु झालेला वाद आणखी वाढत चालला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 एप्रिल: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील F-16 विमान पाडण्यावरून सुरु झालेला वाद आणखी वाढत चालला आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध F-16चा वापर केला इतक नव्हे तर कॅप्टन अभिनंदन यांचे मिग-21 विमान देखील F-16च्या मदतीने पाडल्याचे स्पष्ट पुरावे भारताकडे असल्याचे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे.

भारतीय हवाई दलाने सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, 27 फेब्रुवारी 2019 रोजी दोन लढाऊ विमान पाडले होते. यातील एक विमान हे भारताचे मिग -21 हे होते तर दुसरे विमान पाकिस्तानचे F-16 फायटर जेट होते. एअर पाकिस्तानचे F-16 विमान पाडल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. पण सुरक्षा आणि गोपनियतेच्या कारणामुळे आम्ही याबद्दल अधिक माहिती सांगू शकत नाही, असे एअर व्हॅइस मार्शल आर.जी.के कपूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

याआधी काही दिवासांपूर्वी पाकिस्तानला दिलेली सगळी F-16 विमानं सुरक्षित आहेत, असं आता अमेरिकेने म्हटलं होते. फॉरिन पॉलिसी मासिकाच्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती आली होती. यानंतर पाकिस्ताननेही, भारताने F-16 विमान पाडलंच नाही, असा दावा केला होता. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी या अहवालातील माहिती ट्वीट केली आहे. याबद्दल अल्लाचे आभार मानले पाहिजेत. सत्याचा विजय झाला आहे, असं त्यांनी म्हटलं होते.

VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'

First published: April 8, 2019, 7:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading