24 फेब्रुवारी : आसाममधील जोरहाटजवळ 15 फेब्रुवारीला एका विमान अपघातात भारतीय वायुदलाच्या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. खरंतर अनेकांच्या ही घटना लक्षातही नसेल आणि काहींना ही माहितही नसेल. पण ही बातमी आज सोशल मीडियावर पुन्हा एका चर्चेचा विषय बनली आहे.
ही दुर्देवी घटना झाल्यानंतर त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात वैमानिकाची पत्नी मेजर कुमुद डोगरा आपल्या 5 दिवसाच्या लहान मुलीला घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी गेली होत्या.
डोगरा यांचे पति विंग कमांडर डी. वस्य यांचा विमानाच्या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांची पत्नी कुमुद डोगरा आपल्या 5 दिवसाच्या चिमुकलीला घेऊन पोहचल्या.
ट्विटरवर हा फोटो वेगवेगळ्या कॅपश्नने हा फोटो व्हारल करण्यात आला आहे. अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या आपल्या पतीला सलाम करत आहेत.