नवी दिल्ली 19 जून: चीनसोबतच्या तणावाच्यार पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया (RKS Bhadauria) यांनी लडाख, लेह आणि श्रीनगरचा दोन दिवस दौरा केला आणि तयारीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स सीमेजवळच्या तळांवर तैनात केले असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवाई दलाने सीमेजवळ सुखोई एमकेआई, मिराज 2000 आणि जग्वारसारखी लढाऊ विमाने तैनात केली आहेत. त्यामुळे चीनने केलेल्या कृतीला जशास तसे उत्तर देता येणं शक्य होणार आहे. जमीनीवर कामगिरी करणाऱ्या जवानांसाठी अपाचे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
सैनिकांच्या वाहतुकीसाठी चिनूक हेलिकॉप्टर आणि मालवाहतुकीसाठी MI17 हे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहेत.
Military chopper and fighter jet activity seen in Leh, Ladakh pic.twitter.com/1OoeEIPgrw
— ANI (@ANI) June 19, 2020
गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षामुळे तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर लडाखमध्ये सीमारेषेवर हालचालींना वेळ आला आहे.
भारत चीन : दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची संघर्षानंतर प्रथमच फोनवर चर्चा
सैन्यदलातील अधिकारी आणि जवानांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनआधी जे जवान आपल्या घरी गेले होते त्यांना पुन्हा बोलवून घेण्यात आलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या बैठकांमधून चीनला अद्दल घडवण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
चीनचा सूर बदलला; सीमेवरची परिस्थिती नियंत्रणात पण सैनिकांच्या मृत्यूबद्दल मौन
हिंसक संघर्षानंतर देमचोक आणि पॅगाॉन्ग लेक जवळी सर्व गावं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे. चीनजवळ 3400 किमी दूरपर्यंत नियंत्रण रेषेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर चीनकडून कोणतीही कारवाई झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे आणि कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संपादन - अजय कौटिवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iaf jets, India china border