भारतीय वायुदल इस्रायलकडून घेणार 100 SPICE Bombs; Airstrike करताना वापरली होती हीच अस्त्रं

जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय वायुदलाने Mirage 2000 मधून हेच SPICE bomb वापरले होते. त्याच बाँबची मोठ्या प्रमाणावर खरेदी इस्रायलकडून केली जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 09:30 PM IST

भारतीय वायुदल इस्रायलकडून घेणार 100 SPICE Bombs; Airstrike करताना वापरली होती हीच अस्त्रं

नवी दिल्ली, 6 जून : भारतीय वायुदलाने इस्रायलकडून 300 कोटींचे SPICE bombs घ्यायचा करार केला आहे. या नव्या शस्त्रास्त्र आणि स्फोटकं खरेदीमुळे भारतीय सैन्यदलाला सीमेपलीकडच्या दहशतवादाशी लढा द्यायला मोठं बळ मिळेल, असं बोललं जात आहे. यासंदर्भातली बातमी ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आल्यानंतर सैन्यदलाकडून झालेला हा मोठा शस्त्रास्त्र खरेदी करार ठरण्याची शक्यता आहे.

भारतीय वायुदलाने जैश ए मोहम्मदच्या पाकिस्तानातल्या तळांवर एअर स्ट्राइक (Airstrike) करण्यासाठी याच स्पाईस बाँबचा वापर केला होता. 26 फेब्रुवारीला भारताच्या मिराज 2000 या विमानांनी बालाकोटच्या जैश ए मोहंमदच्या तळांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती SPICE-2000 या बॉम्बची. लक्ष्याला अचूक भेदण्याची क्षमता असलेल्या या बॉम्बमुळे पाकिस्तानबरोबरच चीनलाही दहशत आहे. भारतीय वायुदलाचाही या बॉम्बवर मोठा विश्वास आहे. या बॉम्बचं वैशिष्ट्य म्हणजे हा गाईडेड बॉम्ब आहे. यात दोन भाग आहेत. पहिल्या भागाच्या पुढे एक कॅमेरा लावलेला असतो. तर मागच्या भागात एक चीप लावलेली आहे. त्यातून यावर नियंत्रण ठेवता येते. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा बॉम्ब टार्गेटचा फोटो काढून तो आपल्या मेमरीत असलेल्या फोटोशी जुळवून बघतो आणि नंतर लक्ष्यभेद करतो. SPICE चा अर्थ आहे Smart, Precise Impact, Cost-Effectiveमिराज 2000 या भारतीय वायुदलाने वापरलेल्या लढाऊ विमानांमध्ये हे स्पाईस बाँबच लादून नेण्यात आले होते. या बाँबनी लक्ष्याचा अचूक वेध घेत जैशचा तळ उद्ध्वस्त केला. हा बॉम्ब टाकण्याआधी एक प्रोग्राम बनवला जातो आणि त्याच्या मेमरी चीपमध्ये फिड केला जातो. किती उंचीवरून, केव्हा, कुठल्या दिशेला आणि किती वेळात लक्ष्यभेद करायचं हे सगळं आखून दिलं जातं. त्यानुसार SPICE-2000 सगळं काम फत्ते करतो.

जैश चा तळ उध्दवस्त करणाऱ्या भारताच्या या 'बॉम्ब'ने चीनलाही फुटतो घाम!

दोन नव्हे भारताने तीन वेळा सर्जिकल स्टाईक, केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला दावा

या बॉम्बचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवता येते. लक्ष्याचा वेध घेत असताना दिशा चुकली तर त्याला योग्य दिशा दिला जावू शकते. जे टार्गेट आहे त्याचे फोटो आधीच स्पाईस च्या मेमरीत टाकले जातात. लक्ष्याच्या जवळ गेल्यानंतर स्पाईस त्याचे फोटो घेतो आणि तेच टार्गेट आहे की नाही याची खातर जमा करतो. ते योग्य असेल तर मग टार्गेट उद्ध्वस्त केलं जाते.

पहिल्या 'सर्जिकल स्ट्राईक'वर लष्कराचं स्पष्टीकरण, काँग्रेस पडलं तोंडघशी


भारताने बालकोटमधल्या जैश च्या तळाला उध्वस्त केले नाही अशी चर्चा होती मात्र. त्याची शक्यताच नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण अचूक लक्ष्याचा वेध घेणं हेच या बॉम्बचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कुणीही शंका घेऊ नये असं तज्ज्ञांच मत आहे.भारताने बालकोटमधल्या जैश च्या तळाला उध्वस्त केले नाही अशी चर्चा होती मात्र. त्याची शक्यताच नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण अचूक लक्ष्याचा वेध घेणं हेच या बॉम्बचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कुणीही शंका घेऊ नये असं तज्ज्ञांच मत आहे.

या खास बॉम्बची निर्मिती इस्त्रायल करत असतो. इस्त्रायलची राफेल अॅ़डव्हांस डिफेंस सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी हे बॉम्ब बनवते. मिराज 2000मधून ते टाकता येवू शकतात. जगातल्या शक्तिशाली बॉम्बमध्ये स्पाईसचा समावेश होतो. त्यामुळे चीनही या शक्तिला घाबरून असतो असं तज्ज्ञांच मत आहे.

SPECIAL REPORT : फडणवीसांचा लवकरच काँग्रेसवर 'सर्जिकल स्ट्राईक'?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 09:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...