जोरहाट (आसाम), 3 जून : भारतीय वायुदलाचं AN-32 हे विमान उड्डाणानंतर अचानक गायब झालं आहे. जोरहाट इथून या विमानानं दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी उड्डाण केलं. मेंचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर या विमानाचं लँडिंग होणं अपेक्षित होतं. पण उड्डाणानंतर अर्ध्या तासात या विमानाचा जमिनीशी संपर्क तुटला. दुपारी 1 वाजता या विमानानं जमिनीवरच्या कक्षाशी संपर्क साधला होता. पण तो शेवटचा. त्यानंतर अद्याप या विमानाकडून कुठलाही संदेश किंवा संपर्क झालेला नाही.
या विमानात कर्मचारी, हवाई दलाचे अधिकारी आहेत. शिवाय काही सामान्य नागरिकही आहेत, अशी माहिती मिळते आहे.
या विमानात 8 क्रू मेंबर आणि इतर 5 असे एकूण 13 प्रवासी आहेत. भारतीय वायुदलाकडून या विमानाचा तपास सुरू आहे. परिसरात कुठेही विमान पडलं का, क्रॅश झालं की भरकटलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Indian Air Force launches Sukhoi-30 combat aircraft and C-130 Special Ops aircraft on a search mission for locating the IAF AN-32 Aircraft that last contacted ground sources at 1 PM https://t.co/AciubbR92w
— ANI (@ANI) June 3, 2019
या बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी हवाईदलाने पूर्ण बळ लावलं आहे. सुखोई 30 Sukhoi-30 आणि C - 130 ही खास लढाऊ विमानं या गायब झालेल्या विमानाचा शोध घेत आहेत. भारतीय हवाईदल बेपत्ता झालेल्या विमानातल्या 13 जणांचा युद्धपातळीवर शोध घेत आहे.
दोन वर्षांपूर्वी असंच हवाई दलाचं विमान बेपत्ता झालं होतं. ही दुर्घटना 22 जुलै 2016 रोजी घडली होती. चेन्नईतून उड्डाण केलेलं हे विमान 32 प्रवाशांसह अचानक बेपत्ता झालं होतं. अंदमानातल्या पोर्ट ब्लेअरकडे निघालेलं असतानाच हे विमान रडारवरून अचानक नाहीसं झालं.
(ही बातमी अपडेट होत आहे.)
SPECIAL REPORT : नागाला वाचवण्यासाठी प्राणाची बाजी, विहिरीतील थरार कॅमेरात कैद