News18 Lokmat

कठुआ प्रकरणातील दोषींना फाशी देण्यासाठी मी जल्लाद होण्यास तयार -आनंद महिंद्रा

मी शांत राहण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण हे सगळं बघून माझं रक्त खवळतं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2018 05:38 PM IST

कठुआ प्रकरणातील दोषींना फाशी देण्यासाठी मी जल्लाद होण्यास तयार -आनंद महिंद्रा

16 एप्रिल : कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणांवर उद्योगपती आनंद महिंद्रांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. या प्रकरणांमधल्या दोषींना फाशी देण्यासाठी मी जल्लाद म्हणून काम करायला तयार आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा हे टि्वटर सेलिब्रिटी म्हणून ओळखले जातात. कठुआ प्रकरणावर बाॅलिवूडच्या सेलिब्रिटींनी कठुआ प्रकरणावर निषेध नोंदवलाय. आनंद महिंद्रा यांनीही टि्वट करून आपला संताप व्यक्त केला. कठुआ प्रकरणातील दोषींना फाशी देण्यासाठी मी जल्लाद म्हणून काम करायला तरा आहे.  मला यात कुठलीच शंका नाही, असं त्यांनी ट्विट केलंय.

महिंद्रांच्या या ट्विटला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोमवार दुपारी 12 वाजेपर्यंत याला 3 हजार 300 रिट्विट आणि सात हजार 300 लाईक्स मिळाले होते.

पाहूयात त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय...

"जल्लादाचं काम तसं पहायला गेलं तर फार भूषणावह नाहीये. पण लहान मुलींवर बलात्कार आणि खून करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यासाठी मी जल्लाद बनायला तयार आहे. मी शांत राहण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण हे सगळं बघून माझं रक्त खवळतं."

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...