Elec-widget

उन्नाव-कठुआ प्रकरणातल्या दोषींना फाशी देताना मला जल्लाद व्हायचंय,उद्योगपती आनंद महिंद्रांचा उद्रेक

उन्नाव-कठुआ प्रकरणातल्या दोषींना फाशी देताना मला जल्लाद व्हायचंय,उद्योगपती आनंद महिंद्रांचा उद्रेक

महिंद्रांच्या या ट्विटला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोमवार दुपारी 12 वाजेपर्यंत याला 3 हजार 300 रिट्विट आणि सात हजार 300 लाईक्स मिळाले होते.

  • Share this:

15 एप्रिल : कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणांवर अख्ख्या देशात संतापाची लाट उसळलेय.  उद्योगपती आनंद महिंद्रांनीही यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. या प्रकरणांमधल्या दोषींना फाशी देण्यासाठी मी जल्लाद म्हणून काम करायला तयार आहे. मला यात कुठलीच शंका नाही, असं त्यांनी ट्विट केलंय.

महिंद्रांच्या या ट्विटला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोमवार दुपारी 12 वाजेपर्यंत याला 3 हजार 300 रिट्विट आणि सात हजार 300 लाईक्स मिळाले होते.

काय म्हटलंय ट्विटमध्ये?

जल्लादाचं काम तसं पहायला गेलं तर फार भूषणावह नाहीये. पण लहान मुलींवर बलात्कार आणि खून करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यासाठी मी जल्लाद बनायला तयार आहे. मी शांत राहण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण हे सगळं बघून माझं रक्त खवळतं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 12:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com