S M L

गाण्याबद्दल मोदींना काय वाटलं हे जाणून घ्यायला उत्सुक - आशा भोसले

नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्या समोर आपल्या आवाजातलं गाणं चीनी कलाकारांनी वाजवलं याचा आनंद झाल्याचं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी म्हटलं आहे

Ajay Kautikwar | Updated On: Apr 29, 2018 12:08 PM IST

गाण्याबद्दल मोदींना काय वाटलं हे जाणून घ्यायला उत्सुक - आशा भोसले

मुंबई, 29 एप्रिल : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्या समोर आपल्या आवाजातलं गाणं चीनी कलाकारांनी वाजवलं याचा आनंद झाल्याचं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी म्हटलं आहे.

हे खरंतर आर डी बर्मन आणि गीतकाराचं श्रेय आहे, असंही त्या म्हणाल्या. माझी इतरही अनेक गाणी लोकप्रिय आहेत. पण चीनच्या लोकांनी हेच गाणं निवडलं म्हणजेच त्यांना संगीताची पारख चांगली आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

शनिवारी शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मोदी आणि जिनपींग यांच्या समोर १९८० च्या दशकातला प्रसिध्द चित्रपट 'ये वादा रहा' मधलं "तू, तू है वही... दिल, ने जिसे अपना कहा...तू है जहां, मैं हूं वहां" हे गाणं चिनी कलाकारांनी वाजवलं आणि दोन्ही नेत्यांनी त्याला दादही दिली होती.

 

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2018 12:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close