Home /News /national /

भाजप सोडण्याच्या चर्चेवर रक्षा खडसे यांनी केला मोठा खुलासा

भाजप सोडण्याच्या चर्चेवर रक्षा खडसे यांनी केला मोठा खुलासा

'एकनाथ खडसे यांना आलेल्या अनुभवाच्या आधारावरती त्यांनी राजीनामा दिला. पण नाथाभाऊंचा माझ्यावरती कुठलाही दबाव नाही.'

नवी दिल्ली 21 ऑक्टोबर: एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. रक्षा खडसेही भाजप सोडतील अशीही चर्चा होती. मात्र त्यांनी या सगळ्या चर्चेला पूर्णविराम देत भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, मी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देणार नाही. मी पक्षाची कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. त्या पुढे म्हणाल्या, पक्षाने जी जबाबदारी दिली होती ती मी पूर्ण करेल. एकनाथ खडसे यांना आलेल्या अनुभवाच्या आधारावरती त्यांनी राजीनामा दिला. पण नाथाभाऊंचा माझ्यावरती कुठलाही दबाव नाही, असं मत खासदार रक्षा खडसे यांनी ‘न्यूज18 लोकमत’शी बोलताना व्यक्त केलं. घोषणा करताना एकनाथ खडसे भावुक गेल्या 40 वर्षांपासून भाजपमध्ये काम करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजप पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. पक्षात बाहेर पडत असल्याची घोषणा करताना एकनाथ खडसे यांचा गळा भरून आला होता. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे बाहेर पडत असल्याचे खडसेंनी सांगितले. खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठीच दुर्दैवी, आता दिल्या घरी सुखी राहा- रावसाहेब दानवे गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज एकनाथ खडसे यांनी या चर्चेला पूर्णविराम देत राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. 'माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला होता. त्यानंतर त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून  गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते , असा धक्कादायक खुलासा खडसेंनी केला.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Eknath khadse

पुढील बातम्या