...तर वाराणसीतून निवडणूक लढवण्यास आवडेल- प्रियांका गांधी

वाराणसीतून निवडणूक लढण्याविषयी काय म्हणाल्या प्रियांका गांधी...

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 05:58 PM IST

...तर वाराणसीतून निवडणूक लढवण्यास आवडेल- प्रियांका गांधी

वायनाड, 21 एप्रिल: वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. या मतदारसंघातून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते आणि काही नेते करत आहे. काँग्रेसने अद्याप याबद्दल अधिकृत काहीच सांगितले नाही. काही दिवसांपूर्वी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा करून काँग्रेस धक्का देऊ शकते असे वृत्त आले होते. पण आता खुद्द प्रियांका गांधी यांनी याबद्दल त्यांचे मत सांगितले आहे.

वाराणसीबाबत काँग्रेसचा निर्णय झालेला नाही. पण वायनाड दौऱ्यावर आलेल्या प्रियांका गांधी यांना पत्रकारांनी वाराणसीतून निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला. यावर प्रियांका म्हणाल्या, काँग्रेस अध्यक्षांनी मला सांगितले तर वाराणसीतून निवडणूक लढवण्यास मला आवडेल.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान व्ही.व्ही वसंत कुमार यांच्या कुटुंबीयांची प्रियांका गांधी यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाराणसी येथील उमेदवारीवरून वरील वक्तव्य केले.Loading...

वारणसीमधून मोदींच्या विरोधात एक लष्करातील माजी जवान, 111 जवान आणि एक निवृत्त न्यायाधिश निवडणूक लढवत आहेत. 2014मध्ये मोदींनी येथून विजय मिळवला होता. तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यामुळे केजरीवाल यांची उमेदवारीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. पण यंदा मात्र ही निवडणूक आणखी रंजक होणार आहे. मोदींना टक्कर देण्यासाठी नोकरीतून काढून टाकण्यात आलेला बीएसएफचा जवान आणि तामिळनाडूतील शेतकरी मैदानात उतरले आहेत.

निवृत्त न्यायाधीश लढणार

कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश चिन्नास्वामी स्वामीनाथन कर्णन वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. 2017मध्ये त्यांना 6 महिन्यासाठी तुरुंगात जावे लागले होते. आता ते भ्रष्टाचाराची निवडणूक लढवणार आहेत. 2018मध्ये त्यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली होती. 63 वर्षीय कर्णन यांनी सेंट्रल चेन्नई बरोबरच वाराणसीतून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जवानांसाठी निवडणुकीच्या रिंगणात तेज बहादुर

बीएसएफमधील जवान तेज बहादुर यादव गेल्या एक वर्षात चर्चेत आले आहेत. जवानांना दिले जाणाऱ्या जेवणाचा दर्जा खराब असल्यावरून यादव यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अर्थात चौकशीनंतर त्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आणि त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. यादव यंदा वाराणसीतून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीत भलेही माझा पराभव होईल पण हायप्रोफाईल मतदारसंघातून निवडणू्क लढवल्यामुळे जवानांच्या समस्येवर प्रकाश पडेल असे त्यांनी सांगितले.

दिल्लीनंतर आता शेतकरी वाराणसीत

मोदींच्या विरोधात वाराणसीतून 111 शेतकरी निवडणूक लढवत आहेत. 2017मध्ये तामिळनाडूच्या 111 शेतकऱ्यांच्या गटाने दिल्लीत आंदोलन केले होते. या गटाचे नेतृत्व पी.अय्यकन्नू करत आहेत.

याशिवाय भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी देखील 30 मार्चला रोड शो करत मोदींच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील फ्लोरोसिस पीडित रुग्णांसाठी काम करणारे वड्डे श्रीनिवासन आणि जलगम सुधीर हे देखील मोदींविरोधात निवडणूक लढवणार आहेत. या दोघांचा हेतू लोकांचे लक्ष वेधण्याचा आहे. हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक आणि संकट मोचन मंदिराचे महंत विश्वंबर नाथ मिश्रा हे देखील निवडणूक लढवणार आहेत. मिश्रा यांनी गंगा स्वच्छता अभियानासाठी देखील काम करत आहेत. काही वृत्तानुसार मिश्रा काँग्रेसकडून निवडणू्क लढवणार आहेत. पण या वृत्ताला कोणी दुजोरा दिला नाही.VIDEO : साताऱ्यातील आजींनी दिल्या शिव्या, म्हणाल्या कशाला पाहिजे सरकार?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 05:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...