'सिंघम' फेम 'जयकांत शिक्रें'ची राजकारणात एंट्री, 'या' पक्षाकडून लढवणार निवडणूक

'सिंघम' फेम 'जयकांत शिक्रें'ची राजकारणात एंट्री, 'या' पक्षाकडून लढवणार निवडणूक

प्रकाश राज हे गेल्या काही काळापासून केंद्र सरकारवर परखड टीका करत आहेत. मोदी सरकारविरोधी कठोर भूमिकेसाठी ते चर्चेत आहेत.

  • Share this:

बंगळुरू, 1 जानेवारी: बॉलिवूडनंतर आता अभिनेते प्रकाश राज यांनी राजकारणात एंट्री केली आहे. 'मी  2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार आहे,' अशी घोषणा प्रकाश राज यांनी ट्विटरवरून केली आहे.

प्रकाश राज हे गेल्या काही काळापासून केंद्र सरकारवर परखड टीका करत आहेत. मोदी सरकारविरोधी कठोर भूमिकेसाठी ते चर्चेत आहेत. अशातच त्यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सिंघम' या चित्रपटात अभिनेते प्रकाश राज यांनी साकारलेल्या 'जयकांत शिक्रे' या खलनायकी पात्राद्वारे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

'तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर मी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. मतदारसंघाबाबतची माहिती लवकरच देईल. अबकी बार जनता की सरकार!' असं ट्वीट प्रकाश राज यांनी केलं आहे.

कोण आहेत प्रकाश राज?

मूळचे कर्नाटकचे असणाऱ्या प्रकाश राज यांनी कन्नड टेलिव्हिजनपासून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. त्यानंतर कन्नड, तामिळ सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाची मोहर उमटवली. दक्षिण चित्रपटांत आपल्या भूमिका चोख बजावणाऱ्या प्रकाश राज यांनी नंतर बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यांची बॉलिवूडमधील एंट्रीही यशस्वी ठरली.

मोदी सरकारवर हल्लाबोल

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या लोकांना ट्विटरवर फॉलो करतात, असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

त्यानंतर आक्रमक झालेल्या प्रकाश राज यांनी पुढे अनेक मुद्द्यांवरून सरकारविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ज्योतिष परिषद 2019 : राज ठाकरेंचं भविष्य काय?

First Published: Jan 1, 2019 10:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading