मी पत्रकार परिषद घ्यायला घाबरणारा पंतप्रधान नव्हतो : मनमोहन सिंग

मी पत्रकार परिषद घ्यायला घाबरणारा पंतप्रधान नव्हतो : मनमोहन सिंग

'मी मौन बाळगणारा पंतप्रधान होतो, असं लोक म्हणतात. पण माझं पुस्तकच याला उत्तर देईल.'

  • Share this:

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : 'मी असा पंतप्रधान होतो जो पत्रकार परिषद घेण्यासाठी घाबरत नव्हतो,' असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यातून मनमोहन सिंग यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कारण पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.

मनमोहन सिंग यांच्या 'चेंजिंग इंडिया' या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. यावेळी त्यांनी देशातील विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.

'मी मौन बाळगणारा पंतप्रधान होतो, असं लोक म्हणतात. पण माझं पुस्तकच याला उत्तर देईल. मी कधीच असा पंतप्रधान नव्हतो, जो मीडियासमोर यायला घाबरतो. मी नियमितपणे पत्रकारांना भेटत होतो आणि प्रत्येक परदेश दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेत होतो,' असं मनमोहन सिंग म्हणाले.

'भारत जागतिक अर्थव्यवस्थेचं पावर हाऊस होणार'

'जागतिक अर्थव्यवस्थेचं मुख्य सत्ताकेंद्र बनणं भारताच्या भाग्यात लिहिलेलं आहे. 1991 नंतर भारताचा जीडीपी साधारपणे सात टक्क्यांपर्यंत कायम आहे,' असं म्हणत ज्येष्ठ अर्थतज्ञ असलेल्या मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेबाबत आपले विचार स्पष्ट केले.

'कितीही अडथळे आले तरी भारत प्रगती करणारच'

'अडचणी आणि समस्या असतानाही भारत योग्य दिशेने पुढे जात राहिल. मी अशी आशा करतो की सरकार रिझर्व्ह बँकेसोबत काम करताना योग्य मार्ग काढेल,' असं म्हणत मनमोहन सिंग यांनी रिझर्व्ह बँकेसोबत सरकारच्या सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य केलं.

VIDEO : मोदी नको भाजपचं आता नेतृत्व गडकरींकडे द्या, सरसंघचालकांना पत्र

First published: December 19, 2018, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading