Home /News /national /

मी त्या रात्री दिल्लीत नव्हतो, निर्भयाच्या दोषीचा धक्कादायक दावा

मी त्या रात्री दिल्लीत नव्हतो, निर्भयाच्या दोषीचा धक्कादायक दावा

20 मार्च रोजी निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात येणार आहे. त्यादरम्यान निर्भयाच्या दोषीने हा धक्कादायक दावा करीत याचिका दाखल केली आहे.

    नवी दिल्ली, 18 मार्च : 20 मार्च...निर्भयाच्या दोषींचा फाशीचा दिवस. या दोषींची अस्वस्थता वाढत आहे. मंगळवारी दिल्ली सत्र न्यायालयाने (Delhi Session Court) फटकारल्यानंतरही दोषी मुकेशने (Mukesh singh) ती याचिका पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पतियाळा हाऊस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत निर्भयाचा दोषी मुकेश याने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पतियाळा हाऊस कोर्टाने मुकेशची याचिका फेटाळून लावली. या याचिकेत मुकेश निर्भयावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या (Nirbhaya Gang Rape) दिवशी दिल्लीत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आज दुपारी कोर्टात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. हे वाचा - कोरोनासाठी रक्ताची चाचणी केली जात नाही तर...., आरोग्य विभागाचा मोठा खुलासा या अर्जावर वकिलाला कोर्टाने फटकारलं होतं पतियाळा हाऊस कोर्टाने मंगळवारी दोषी मुकेशच्या याचिकेवर सुनावणी देताना दोषीच्या वकिलांना फटकारले होते. कोर्ट म्हणालं होतं की, ‘कोर्टाचा वेळ हा मौल्यवान आहे, त्याचा उपयोग हुशारीने करायला हवा.’ अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी दोषीची बाजू फेटाळून लावली व ते म्हणाले की, न्यायालयासाठी वेळ खूपच महत्वाचा आहे. याचा उपयोग हुशारीने करायला हवा. त्यांनी हे प्रकरण बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवित दोषीचा वकील एम.एल. शर्मा यांना प्रकरण  संवेदनशीलतेने घेण्याचे निर्देश दिले. शर्मा यांनी मुकेशच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायाधीश राणा यावेळी म्हणाले होते की, "दोषींच्या वकिलाने केवळ कोर्टात खोटी तथ्य मांडली नाही, तर वकील म्हणून आपले कर्तव्य बजावण्यात देखील अपयशी ठरले. हे वाचा - धोनीचं कमबॅक होणार की नाही? टीम इंडियाबद्दल सेहवागचं मोठं वक्तव्य दोषींचा काय आहे दावा वकील शर्मा यांनी दावा केला होता की, मुकेशला राजस्थानातून अटक करण्यात आली होती आणि 17 डिसेंबर 2012 रोजी त्याला दिल्लीला आणण्यात आले होते. या गुन्ह्यासंदर्भात मुकेश 16 डिसेंबर रोजी शहरात उपस्थित नव्हता, असेही याचिकेत म्हटले आहे. सरकारी याचिकाकर्ते इरफान अहमद यांनी या याचिकेला विरोध दर्शविला. दोषीची बाजू मांडणे निरर्थक असल्याचे सांगत, फाशी टाळायची ही युक्ती होती असा दावा त्यांनी केला आहे. मुकेशसिंग याच्यावर तिहार तुरूंगात अत्याचार केल्याचा आरोपही शर्मा यांनी याचिकेत केला आहे. दोषींच्या फाशीसाठी ट्रायल कोर्टाने 20 मार्चची मुदत दिली आहे. दोषींनी 16 डिसेंबर 2010 च्या रात्री पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Nirbhaya gang rape case

    पुढील बातम्या