मला तुमच्याशी बोलायचंय, प्रवीण तोगडियांचं मोदींना भावूक पत्र

मला तुमच्याशी बोलायचंय, प्रवीण तोगडियांचं मोदींना भावूक पत्र

राम मंदिर, गोवंश हत्या, समान नागरी कायदा अशा विविध मुद्यांवर चर्चा करायची आहे.

  • Share this:

15 मार्च : विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष  प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी  जुन्या आठवणींना उजाळा देत भेटण्यासाठी वेळ मागितला आहे.

प्रवीण तोगडिया यांनी आज नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या जुन्हा आठवणींना उजाळा दिला. आमचे घर आणि कार्यालयात तुमचे येणे, सोबत भोजन, चहापान करणे, मनमोकळेपणाने हसणे यापैकी काहीही तुम्ही विसरला नसाल. मित्रत्व आणि मोठा भाऊ या नात्याने आपली विविध विषयांवर मोकळेपणाने चर्चा व्हायची. एकमेकांसाठी एकमेकांसोबत उभे राहायचो. जे 2002 नंतर कमी होत गेली, पण मला तुमच्याशी बोलायचं असं म्हणत तोगडियांनी भावनिक पत्र लिहिलंय.

तोगडिया यांनी मोदींना लिहिलेले पत्र हे मोदींसोबतच्या मैत्रीची नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न मानण्यात येत आहे.

तोगडियांनी काय लिहिलं पत्रात...

बऱ्याच काळापासून आपल्यामध्ये मनमोकळेपणाने बोलणे झालेले नाही. जसे 1972 ते 2005 या काळात व्हायचे. देश, गुजरात आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात जे प्रश्न उपस्थित झाले. त्यावर आपण दोघांनीही वेळोवेळी एकमेकांसोबत राहून काम केले आहे. आमचे घर आणि कार्यालयात तुमचे येणे, सोबत भोजन, चहापान करणे, मनमोकळेपणाने हसणे यापैकी काहीही तुम्ही विसरला नसाल. मित्रत्व आणि मोठा भाऊ या नात्याने आपली विविध विषयांवर मोकळेपणाने चर्चा व्हायची. एकमेकांसाठी एकमेकांसोबत उभे राहायचो. जे 2002 नंतर कमी होत गेलं. सत्तास्थानी गेल्यानंतर तुम्ही माझ्यापासून आणि मूळ विचारसरणीपासून फारकत घेतली. तरीही आजही माझ्या मनात मित्रत्व आणि संवादाची अपेक्षा कायम आहे, त्यामुळेच हा पत्रप्रपंच केला. राम मंदिर, गोवंश हत्या, समान नागरी कायदा अशा विविध मुद्यांवर चर्चा करायची आहे.

First published: March 15, 2018, 9:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading