'CRPFचे 40 जवान शहीद झालेत त्यावरही मला शंका आहे', फारूख अब्दुल्लाचं वादग्रस्त विधान

'CRPFचे 40 जवान शहीद झालेत त्यावरही मला शंका आहे', फारूख अब्दुल्लाचं वादग्रस्त विधान

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात फारूख अब्दुल्ला यांचं वादग्रस्त विधान

  • Share this:

श्रीनगर, 30 मार्च :  जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आपल्या आक्षेपार्ह विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. '14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेत... त्यावरही मला शंका आहे', असे विधान करत फारूख अब्दुल्ला यांनी नवीन वाद निर्माण केला आहे.

नेमकं काय म्हणालेत फारूख अब्दुल्ला?

''छत्तीसगडमध्ये आपल्या देशातील किती जवान शहीद झालेत? पंतप्रधान मोदी तेथे श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेत का? त्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचं सांत्वन केलं का? किंवा जितकेही जवान तेथे शहीद झाले त्यांच्याबाबत कधी काही म्हटलं आहे का? अशी प्रश्नांची सरबत्ती अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींवर केली.  यानंतर ते म्हणाले की, 'पण पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेत, त्यावरही मला संशय आहे'.  या विधानामुळे अब्दुल्ला यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

यावेळेस त्यांनी 'मिशन शक्ती' वरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. तसंच त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मिशन शक्तीचं श्रेय  दिले. अब्दुल्ला म्हणाले की,''जे मिसाईल शत्रू राष्ट्राचे सॅटेलाईट पाडण्यासाठी सोडण्यात आलं त्याची निर्मिती मनमोहन सिंग यांनी केली आहे. पण सिंग यांनी त्याबाबत जाहीर विधान केलं नव्हतं. आता निवडणुका आल्या आहेत. प्रचारासाठी खुद्द हनुमान आले आणि त्यांनीच बटण दाबलं. एक चुकीचं बटण दाबलं गेलं आणि हेलिकॉप्टर पडलं, आपले 6 जवान शहीद झाले.यापूर्वी, फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक कारवाईसंदर्भातही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

वाचा अन्य बातम्या

सचिनने का घेतली शरद पवारांची भेट? राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया

'राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर मिळणाऱ्या 6000 रुपयांमधून पोटगी देईन'

VIDEO: ..आणि नातीने नाकारली शहा आजोबांची टोपी

VIDEO: 'आपला पंतप्रधान कोण?' उद्धव ठाकरे म्हणाले...

First published: March 30, 2019, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading