मराठी बातम्या /बातम्या /देश /

…तर विकास दुबेला मीच गोळी घातली असती - ऋचा दुबे

…तर विकास दुबेला मीच गोळी घातली असती - ऋचा दुबे

विकास गुन्हेगार असला तरी त्याच्या मुलांना मी गुन्हेगार होऊ दिलं नाही. माझ्या मोठ्या मुलाने मेडिकलची तीन वर्ष पूर्ण केली आहेत. लहान मुलाने 91.4 टक्के गुण मिळवले आहेत.

    नवी दिल्ली, 23 जुलै : 8 पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे याचा पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर विकास दुबे याची पत्नी ऋचा दुबे पहिल्यांदा माध्यमांसमोर आली आहे. त्या म्हणाल्या की मी विकासला खूप समजावलं. त्या पुढे म्हणाल्या की – विकास माझ्या मोठ्या भावाचा मित्र होता. 23 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं. मी त्याला भांडणं करण्यापासून अडवत होते. मात्र मला त्याच्या गुन्ह्याविषयी काही माहिती नाही. ऋचा दुबे पुढे म्हणाल्या, माझ्या आयुष्याचं एकचं ध्येय आहे. माझ्या मुलांना या गुन्हेगारीच्या जगापासून लांब ठेवणं. मी हे सिद्धही केलं आहे. माझ्या मोठ्या मुलाने मेडिकलची तीन वर्ष पूर्ण केली आहेत. लहान मुलाने 91.4 टक्के गुण मिळवले आहेत. हे वाचा-धक्कादायक! कारमध्ये तरुणीवर अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर सोडलं लोक म्हणतात की गुन्हेगाराचा मुलगा गुन्हेगारच होता. पण असं नाहीये..माझ्या आयुष्याचं ध्येय मुलांना मोठ्या पदावर घेऊन जाण्याचं आहे. मला लोकांना दाखवून द्यायचं आहे की गुन्हेगाराचा मुलगा गुन्हेगार होत नाही. आज तकने घेतलेल्या मुलाखतीत विकास दुबेची पत्नी ऋचा दुबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या गुन्ह्यांशी माझा काही संबंध नाही ऋचा दुबेने सांगितले की मुलांना भेट घडवून आणण्यासाठीच मी गावी जात होते. माझ्या आयुष्याचं लक्ष्य केवळ माझी मुलं आहेत. त्याच्या कृत्यांचा परिणाम माझ्या मुलांवर पडता कामा नये. कानपूरमध्ये गोळीबारात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत ऋचा म्हणाल्या की त्या पोलिसांच्या पत्नींबाबत मला संवेदना आहे. विकास चुकीचचं वागला, त्याच्या कृत्यांसाठी माफी मागते. ऋचा दुबे पुढे म्हणाल्या – जर अशा घटनेनंतर विकास दुबे माझ्या समोर असता तर मी स्वत: त्याला गोळी घातली असती. कारण 17 कुटुंब कोसळण्यापेक्षा एक कुटुंब कोसळणं बरं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime

    पुढील बातम्या