मुलाची स्तुती करणार नाही पण राहुल खंबीर आहे, सोनिया गांधी झाल्या भावूक

मुलाची स्तुती करणार नाही पण राहुल खंबीर आहे, सोनिया गांधी झाल्या भावूक

मी माझे पती आणि मुलाला राजकारणापासून दूर ठेवू पाहत होते. पण, त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आल्यामुळे त्यांनी ती निभावली

  • Share this:

16 डिसेंबर : मी माझे पती आणि मुलाला राजकारणापासून दूर ठेवू पाहत होते. पण, त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आल्यामुळे त्यांनी ती निभावली आता राहुल गांधींही जबाबदारीसाठी पुढे आलाय, राहुल माझा मुलगा आहे त्यांची स्तुती करणार नाही पण तो आता खंबीर आहे अशी भावूक प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली.

आज राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा कारभारी हाती घेतलाय. यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी जुन्या आठवणींना उजाळाला दिला. राजीव गांधी यांच्यासोबत लग्नानंतर इंदिरा गांधी यांनी मला मुलीसारखं समजलं. 1984 मध्ये जेव्हा त्यांची हत्या झाली तेव्हा मला माझी आई सोडून गेली होती. त्यांच्या जाण्यानंतर राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी धुरा सांभाळली पण त्यांचीही हत्या झाली हे सांगताना सोनिया गांधी भावूक झालाय.

20 वर्षांपूर्वी जेव्हा मी अध्यक्ष झाले, तेव्हा माझ्या मनात प्रचंड भीती होती आणि माझे हात कापत होते. माझ्या पुढे खूप कठीण कर्तव्य होतं पण लोकांना प्रतिसाद दिला. त्या बद्दल सर्वांची आभारी आहे.

राहुल गांधी माझा मुलगा आहे. त्यामुळे त्याची स्तुती करणं मला योग्य वाटत नाही. राहुलने लहानपणापासून हिंसा पाहिलीये. जेव्हा राहुल राजकारणात आला तेव्हा त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागला. पण, राहुल हा खंबीर आणि मृदुभाषी व्यक्ती आहे तो नक्की काँग्रेसला एका नव्या उंचीवर नेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

First published: December 16, 2017, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading