चोराच्या उलट्या बोंबा! प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे नीरव मोदीचा कर्ज फेडण्यास नकार

बातमी आहे नीरव मोदीच्या पत्राची. आपण कर्ज फेडू शकत नाही असं त्यानं पंजाब नॅशनल बँकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2018 09:06 AM IST

चोराच्या उलट्या बोंबा! प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे नीरव मोदीचा कर्ज फेडण्यास नकार

20 फेब्रुवारी : बातमी आहे नीरव मोदीच्या पत्राची. आपण कर्ज फेडू शकत नाही असं त्यानं पंजाब नॅशनल बँकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तब्बल 11 हजार ४०० कोटींचा अपहार केलेला नीरव मोदी सध्या परदेशात आहे. बँकेने हे सगळे प्रकरण चव्हाट्यावर आणले त्यामुळे माझा हिरे आणि दागिने व्यवसाय बुडाला, माझ्या मालमत्तांवर जप्ती आली त्यामुळे आता मी कर्ज फेडू शकत नाही असेही नीरव मोदीने म्हटले आहे.

'माझ्या पत्नीचा आणि मामाचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही. त्यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले आहेत. मात्र हे सगळे प्रकरण समोर आल्याने त्यांचीही बदनामी झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेने कर्जाबाबत गुप्तता पाळली नाही त्यामुळे ते फेडण्याचे मार्ग माझ्यासाठी बंद झाले आहेत,' असेही नीरव मोदीनं या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान काल सीबीआयनं पीएनबीच्या ब्रॅडी हाऊसमधून कागदपत्रं ताब्यात घेतली. सीबीआयनं काल याप्रकरणी आणखी तिघांना अटक केली. यामध्ये फॉरेक्स विभागाचे चीफ मॅनेजर बेछू तिवारी, याच विभागाचे स्केल 2चे मॅनेजर यशवंत जोशी आणि एक्स्पोर्ट विभागाचे स्केल वनचे ऑफिसर प्रफुल्ल सावंत यांना काल अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2018 08:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...