डोक्यावर टिळा आणि भस्म लावणाऱ्यांची भीती वाटते, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने वाद

डोक्यावर टिळा आणि भस्म लावणाऱ्यांची भीती वाटते, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने वाद

नेटकऱ्यांनी लगेच त्यांचे आणि राहुल गांधींचे टिळा लावलेले फोटो उत्तरादाखल त्यांना पाठवले.

  • Share this:

बदामी 6 मार्च  : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय. या आधीही त्यांनी एका महिलेशी दुरव्यवहार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला होता. आता नवा वाद त्यांच्या वक्तव्याचा आहे. डोक्यावर टीळा आणि भस्म लावणाऱ्यांची मला भीती वाटते असं वक्तव्य त्यांनी बदामी इथं बोलताना केलं. त्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठलीय.

सिद्धारामय्या हे आपल्या फटकळपणासाठी प्रसिद्ध आहेत. असं वक्तव्य करून सिद्धारामय्या हे हिंदूंचा अपमान करत असल्याची टीका त्यांच्यावर होतेय. काँग्रेस कायम तुष्टिकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. टिव्टरवरूनही सिद्धरामय्यांवर जोरदार टीका होत आहे.

नेटकऱ्यांनी लगेच त्यांचे आणि राहुल गांधींचे टिळा लावलेले फोटो उत्तरादाखल त्यांना पाठवले. कर्नाटकात लिंगायतांचा प्रभाव असून डोक्यावर भस्म लावणं हा त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर दररोजच्या आचरणात त्याला अतिशय महत्त्व आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने या वक्तव्यावरून काँग्रेसला धारेवर धरलंय.

सिद्धरामय्यांनी ओढली महिलेची ओढणी

कर्नाटकचं राजकारण आणि राजकारणी सध्या सतत वादात सापडत आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे आपल्या तापट स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. त्याचा राग कधी कुणावर फुटेल याची काही शाश्वती नसते. 28 जानेवारी सोमवारला तक्रारीसाठी आलेल्या एका महिलेवर ते भडकले आणि त्यांचा संयम सुटला.

एका कार्यक्रमानंतर सिद्धरामय्या हे लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी बसले होते. त्यावेळी एका महिलेने तक्रार सांगत असताना त्यांच्याशी वाद घातला. अनेकदा तक्रारी करूनही काहीच होत नाही. मला सारखे खेटे घालावे लागतात अशी त्या महिलेची तक्रार होती. ती महिला सारखा आपला मुद्दा रेटत असल्याने सिद्धरामय्यांचा तोल गेला.

त्यांनी त्या महिलेला शांत राहा असं बजावलं आणि तिच्या हातातला माईक खाली खेचण्याचा ते प्रयत्न करू लागले.  हे करताना त्यांनी महिलेच्या अंगावरची ओढणीच हाताने खाली खेचली. सिद्धरामय्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading