‘मी टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनताच ठरवेल’

‘मी टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनताच ठरवेल’

काही दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी 'टायगर अभी जिंदा है' असं वक्तव्य केलं होतं

  • Share this:

भोपाळ, 7 जुलै : खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कधी दिग्विजय सिंह तर कधी कमलनाथ हे शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य करीत होतं. काही दिवसांपूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ असं दबंगस्टाईल उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता कमलनाथ यांनी फिरकी षटकार लगावला आहे.

धर जिल्ह्यातील बडनवार येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी शिंदेच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं. यावेळी ते म्हणाले –

मी महाराज नाही...मी टायगरही नाही..मी मामाही नाही..मी कधी चहा विकला नाही..मी कमलनाथ आहे..कोण टायगर आहे आणि कोण नाही...कोण मांजर (Cat) आहे कोण उंदीर (rat)  हे मध्य प्रदेशची जनता ठरवेल..

दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्यावर बरसले

ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर वारंवार आरोप करण्यात येत आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं. ते म्हणाले की, मला कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या प्रमाणपत्रांची गरज नाही. देशातील जनतेसमोर सत्य उघड आहे. या नेत्यांनी राज्याला कसं लुटलं ते सर्वांसमोर आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी उत्तर देईन. सध्या या दोघांना मला इतकंच सांगायचं आहे की, 'टायगर अभी जिंदा है!'

Published by: Meenal Gangurde
First published: July 7, 2020, 7:48 PM IST

ताज्या बातम्या