शरद पवार म्हणाले, मी मुख्यमंत्री होणार नाही पण...

काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पवारांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मांडला होता. राज्यात पवार पुन्हा परत येतील अशीही चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 08:37 PM IST

शरद पवार म्हणाले, मी मुख्यमंत्री होणार नाही पण...

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 4 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर राज्यातल्या सत्ता समिकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे. राज्यातल्या नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधींना भेटणार असल्याचं शरद पवारांनी भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. त्यावेळी त्यांना तुम्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक आहात का? असा प्रश्न विचारला त्यावर पवारांनी नाही असं उत्तर दिलं. मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यातले मतभेद वाढलेच तर महाराष्ट्रात मोठी राजकीय समिकरणं बदलण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

याआधीच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पवारांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मांडला होता. राज्यात पवार पुन्हा परत येतील अशीही चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात अशीही शक्यता व्यक्त  केली जातेय. शरद पवारांनीही राज्यात काय होऊ शकते यावर कुठलीही शक्यता फेटाळली नाही. त्यामुळे सत्ता समिकरणाचं गूढ वाढलं आहे. पुढचे दोन दिवस राज्याच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. पवारांच्या या भेटीत अजित पवारांची उपस्थिती ही लक्षवेधी मानली जातेय.

महाराष्ट्रात घडणार का राजकीय भूकंप? पवार पुन्हा घेणार सोनियांची भेट

दिल्लीत नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर प्रामुख्याने चर्चा झाली. सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेचं बिनसल्याने गेल्या 11 दिवसांपासून सत्ता स्थापन होऊ शकली नाही. त्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी ही भेट झाली.

Loading...

भाजप आणि शिवसेनेचं फाटलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते अशीही चर्चा आहे. उघडपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनाला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावलीय. मात्र राजकारणात सर्व शक्यतांचा विचार केला जात असल्याने गरज पडली तर भाजपला एकटं पाडण्यासाठी राज्यात नवी समिकरणं तयार होऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर पवार आणि सोनिया गांधी यांची भेट महत्त्वाची मानली जातेय.

गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातले काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांना राज्यातल्या स्थितीची माहिती दिली होती. सोनियांशी भेट झाल्यानंतर पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली.

युतीच्या वादात नवा ट्वीस्ट, सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी नितीन गडकरी मैदानात

काय म्हणाले शरद पवार?

पवार म्हणाले, मी सोनियांना महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीची माहिती दिली. राज्यात सध्या अस्थिरता आहे. त्या पार्श्वभूमीवर  आम्ही सगळी चर्चा केली. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला किंवा आम्ही त्यांना कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. राज्यात भाजपच्या विरोधी वातावरण आहे. शिवसेनेने 170 चा नंबर कुठून आणला ते माहित नाही. आमच्याकडे सत्ता बनविण्यासाठी संख्याबळ नाही. संजय राऊत आमच्याकडे 170चं सख्याबळ असल्याचं सांगत आहेत त्यावर बोलताना पवार म्हणाले त्यांच्याबरोबर बरोबर भाजपचा मोठा गट असावा. मुंबईत मंगळवारी पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणार असून त्यानंतर पुन्हा सोनियांशी भेटणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात होणार आहे.

त्यामुळे शरद पवारांनी आपले पत्ते अजूनही उघड केलेले नाहीत. तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार का या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगितलं नसलं तरी त्यांनी अनेक संकेत दिले आहेत. पवार राज्यातल्या नेत्यांशी काय चर्चा करणार आणि पुन्हा सोनियांना कशासाठी भेटणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे.ज्यांना लोकांनी निवडणून दिलं त्यांनी तातडीनं सरकार बनवलं पाहिजे. त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात पुन्हा परत जाणार का या प्रश्नावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं.

मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला नकोत का? काय म्हणाले संजय राऊत

संजय राऊतांनी घेतली राज्यपालांची भेट

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते रामदास कदम हेही सोबत होते. राज्यात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झालाय त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेणं याला महत्त्वाचं मानलं जातंय. राज्यपालांची भेट ही सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली. आम्ही एका मर्यादेत राहून चर्चा केली. लवकरात लवकरच सरकार स्थापन व्हावं अशी विनंती आम्ही केली. सरकार स्थापनेसाठी शिवसेना अडथळा ठरणार नाही असं आम्ही सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या वतीने आम्ही भेटलो. उद्धव ठाकरे यांची आणि बाळासाहेब ठाकरे यांची काही पुस्तकं आम्ही राज्यपालांना भेट दिली अशी माहितीही राऊत यांनी दिली. बाळासाहेबांचं फटकारे हे पुस्तकही राज्यपालांना दिली.

राज्यात जो काही पेच निर्माण झाल त्यासाठी शिवसेना जबाबदार नाही असंही आम्ही त्यांना सांगितलं. राजभवन हे राजकारणाची जागा नाही. आम्ही राज्यपालांना सूचना देणार नाही. ते अतिशय अनुभवी नेते आहेत असंही राऊत यांनी सांगितलं. राज्यपालांसोबत 1 तास चर्चा झाल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला नकोत का? असा प्रश्न जेव्हा संजय राऊतांना विचारला गेला त्यावर राऊत म्हणाले, असं काहीही आम्ही सांगितलं नाही आणि कुणी आमच्या कानातही असं काही सांगितलं नाही. अशा गोष्टी आम्ही करत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...