• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • माझ्या शिंकण्या-हसण्याला म्हणे संघाचा आशीर्वाद- नितीन गडकरी

माझ्या शिंकण्या-हसण्याला म्हणे संघाचा आशीर्वाद- नितीन गडकरी

विरोधक मला बळीचा बकरा बनवत असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 फेब्रुवारी : मी शिंकलो तर मोदींना इशारा आणि हसलो तर अमित शहांना टोला, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या प्रत्येक विधानाचा विपर्यास केला जातो. मला अजिबात पंतप्रधान व्हायचे नाही अशा शब्दात नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचं 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील याचा पुनरूच्चार देखील यावेळी गडकरींनी केला. पंतप्रधान होणे माझ्या स्वप्नात देखील नाही. भिंतीवर पोस्टर चिटकवणाऱ्या कार्यकर्त्याला मिळाले ते पुरेसे नाही का?, मला जे मिळाले ते क्षमतेपेक्षा देखील जास्त आहे. मोदी हेच पुढील पंतप्रधान असतील, असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकीय महत्त्तवाकांक्षा, युती आणि पाच वर्षात केलेल्या कामांवर आपली सडेतोड मतं व्यक्त केली. 'संघाचा लाडका कुणीही नाही' मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लाडका आहे असं माध्यमं म्हणतात. पण, संघाच्या आवडीचा आणि नावडीचा असं नसतं. संघटना आणि देशासाठी काम करणारा प्रत्येक जण संघाचा लाडका असतो, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 'माझ्या प्रत्येक विधानाचा अर्थ मोदींशी' माझ्या प्रत्येक विधानाचा अर्थ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडला जातो. मी शिंकलो तर मोदींना इशारा आणि हसलो तर अमित शहांना टोला. सध्या प्रसारमाध्यमं आणि विरोधक माझ्या प्रत्येक विधानाकडे भिंग लावून पाहत आहेत. आता मी जे काही म्हणणार आहे त्याचा विपर्यास करू नका. नाहीतर मला दहा खुलासे करावे लागतील, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांना काही सवाल केले. 'बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न' विरोधक माझ्या खांद्यावर बंदुक ठेवून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मला बळीचा बकरा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 'राजकारण म्हणून आडकाठी आणणं बदमाशी' विरोधसाठी विरोध मी करत नाही. निवडणुका या 15 दिवसांसाठी असतात. त्या संपल्या की द्वेष मनातून काढून टाकायला हवा. सोनिया गांधी यांनी माझे लोकसभेत अभिनंदन केले. ही माझ्या कामाची पोच पावती आहे. मी सर्वांना मदत करतो. पण, मदत करून मी कुणावर उपकार करत नाही. राजकारण म्हणून आडकाठी करणं केवळ बदमाशी आहे. असं मत देखील गडकरी यांनी मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे.

  VIDEO: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यानं वन कर्मचाऱ्याल केलं जखमी

  First published: