'मी काही आता पक्षप्रमुख नाही, काँग्रेसने लवकर नवा अध्यक्ष निवडावा'

'मी काही आता पक्षप्रमुख नाही, काँग्रेसने लवकर नवा अध्यक्ष निवडावा'

"मी अगोदरच काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता काँग्रेसच्या कार्यकारिणीनं लवकरात लवकर नवा अध्यक्ष ठरवण्यासाठी बैठक घ्यावी", असं राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 जुलै : मी आता पक्षाध्यक्ष नाही. काँग्रेसच्या कार्यकारिणीने तातडीने बैठक घेऊन नवा नेता ठरवावा, असं राहुल गांधी यांनी बुधवारी जाहीर केलं. पत्रकारांशी बोलताना राहुल म्हणाले, "मी अगोदरच काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता काँग्रेसच्या कार्यकारिणीनं लवकरात लवकर नवा अध्यक्ष ठरवण्यासाठी बैठक घ्यावी." काँग्रेसच्या राजकारणाची पुढची दिशा काय असेल, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारल्यावर राहुल यांनी हे असं उत्तर दिलं. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात पक्षाचा दारुण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवली होती.

निकालानंतर दोन दिवसांनी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला होता. हा राजीनामा कार्यकारिणीने तातडीने मंजूर केला नाही. उलट राजीनामा फेटाळून लावत राहुल गांधी यांना पक्षाच्या पुनर्उभारणीसाठी आवश्यक ते बदल करण्याचे सर्वाधिकार देऊ केले. पण राहुल गांधी यांची अध्यक्षपदावर राहायची इच्छा दिसली नाही. काँग्रेसला लोकसभेच्या केवळ 52 जागांवर विजय मिळवता आला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा दिल्याचं राहुल यांनी तेव्हा सांगितलं होतं.

चांद्रयान - 2 : तुम्हालाही प्रत्यक्ष पाहता येणार लाँचिंग, नोंदणी आजपासून

पक्ष कार्यकर्त्यांना मात्र राहुल गांधी यांचा निर्णय मान्य नाही. राहुल यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन केलं. राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावं, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीनेही राहुल यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळे गेला महिनाभर काँग्रेसचं नेतृत्व कुणाच्या हाती जाणार की गांधी घराण्याच्याच हाती पक्ष राहणार, याविषयी चर्चा सुरू होती. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर मधल्या फळीतल्या अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा दिला.

मिशन विधानसभा : कर्जत-जामखेडच का? रोहित पवारांनी केला खुलासा

दोन दिवसांपूर्वी काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्लीत झालेल्या त्यांच्या बैठकीत राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आल्याचं समजतं. पण गांधी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसतं. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनरुच्चार करून अध्यक्षपदी राहण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं.

VIDEO: मी सर्वात नालायक आमदार', खडसेंच्या भाषणाने सत्ताधारी गोटात खळबळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 03:54 PM IST

ताज्या बातम्या