भाजपचा कार्यकर्ता शबरीमला भक्तांसोबत खंबीरपणे उभा-अमित शहा

भाजपचा कार्यकर्ता शबरीमला भक्तांसोबत खंबीरपणे उभा-अमित शहा

केरळच्या कन्नूर येथे आज अमित शहा यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी शबरीमालाच्या मुद्यावर भाष्य केलं.

  • Share this:

केरळ, 27 आॅक्टोबर : शबरीमलाचा वाद पेटलेला असताना आज भाजप अध्यक्ष अमित शहांनी त्यावर जाहीर वक्तव्य केलं. भाजपचा कार्यकर्ता अय्यपा भक्तांसोबत खंबीरपणे उभा आहे, असं शहा यांनी स्पष्ट केलं.

देशात अनेक मंदिरं अशी आहेत, जिथे पुरुषांना प्रवेश नाही, काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही. प्रवेश दिल्यानं स्त्री-पुरुष समानता सिद्ध होत नसते, असंही शहा म्हणाले. पण शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत भाजपची स्पष्ट भूमिका काय, यावर मात्र त्यांनी मौनच बाळगलं.

केरळच्या कन्नूर येथे आज अमित शहा यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी शबरीमालाच्या मुद्यावर भाष्य केलं. भाजपचा कार्यकर्ता हा शबरीमाला सोबतच आहे असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं.

आज केरळमध्ये धार्मिक विश्वास आणि राज्य सरकारच्या कारवाईमुळे संघर्ष पेटला आहे. सरकारने २००० हुन जास्त भाविक, भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबलं आहे असा आरोपही शहा यांनी केली.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध आणि केरळ सरकारनं प्रकऱण चिघळू दिलं अशी भूमिका म्हणजे महिलांना सबरीमला मंदिरात प्रवेशाला विरोध केला आहे असंही शहा म्हणाले.

याआधी शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेश बंदीचं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय. प्रवेश बंदीचं समर्थन करताना त्यांनी सरळ सॅनिटरी नॅपकिनचेच उदाहरण दिलंय. रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाल का, असा प्रतिसवालही त्यांनी केला होता.

=============

VIDEO: मुंबईच्या लोकलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, क्षणात संपलं असतं आयुष्य पण...

First published: October 27, 2018, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading