'मी ब्राह्मण, चौकीदार शब्द का लावू?' भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

'मी ब्राह्मण, चौकीदार शब्द का लावू?' भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

सुब्रह्मण्यम स्वामी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मार्च : काँग्रेसच्या 'चौकीदार ही चोर है' या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप नेत्यांनी ट्विटवरून नावामागे 'चौकीदार' हे नाव लिहायला सुरूवात केली. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह प्रमुख नेत्यांनी त्यांच्या नावामागे चौकीदार असं लिहिलं. त्यावरून आता भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. 'मी ब्राह्मण आहे. नावामागे चौकीदार शब्द का लावू?' असा सवाल स्वामी यांनी केल्यानं आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी त्याबाबची एक क्लिप देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 'मी ब्राह्मण आहे, नावामागे चौकीदार शब्द का लावू? मी आदेश देईन ते काम करणं हे चौकीदाराचं कर्तव्य असल्याचंं' विधान सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलं आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

देशाला शुद्ध करण्यासाठी पुन्हा भाजपलाच निवडून द्या- सुब्रह्मण्यम स्वामी

स्वामींचं आणखी एक वादग्रस्त विधान

तेव्हा एअर स्ट्राईक होणार आहे हे माहीत नव्हते म्हणून मी राम मंदिर झाल्याशिवाय सरकार येणार नाही असं म्हटलं होत, असं सांगत भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी ह्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलं. पिंपरी येथे बोलत असताना त्यांनी हे विधान केलं.

आता मात्र देशात पुन्हा सरकार आलं की राम मंदिरही उभारलं जाईल आणि 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणी काँग्रेसचे सगळे नेते जेलमध्ये जातील आणि त्यांची संपत्तीही जप्त होईल, असं स्वामी यांनी विधान केलं आहे. भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींनी लादेनला मारणाऱ्या अमेरिकेकडे पुरावे का मागितले नाही? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. राफेलसह येडीयुरप्पांच्या डायरीवरुन आरोप करण्यापेक्षा पुरावे असतील राहुल गांधी न्यायालयात का जात नाहीत? असा सवाल करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

'मनमोहन सिंग सर्कशीतला सिंह'

यावेळी स्वामी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्कशीतला सिंह म्हणूनही संबोधलं. एव्हढंच नाही तर पुन्हा एकदा देशाचं पुनरुत्थान करण्याची वेळ आली असून, देशात कित्येक वर्षांपासून कचऱ्यासारखे जमलेल्यांना बाहेर काढायची गरज असल्याचे ते म्हणाले. देशाला शुद्ध करण्यासाठी पुन्हा भाजपला निवडून देण्याचंही आवाहन करत स्वामींनी वादग्रस्त विधान करण्याची परंपरा कायम ठेवली.

VIDEO: 'राहुल शेवाळेंना आर्शिवाद आहेच पण उद्धव ठाकरेंचा आशिर्वाद मला पाहिजे'

First published: March 24, 2019, 9:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading