टेक महिंद्राच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची आत्महत्या; ऑफिसच्या सहाव्या माळ्यावरूनच मारली उडी

टेक महिंद्राच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची आत्महत्या; ऑफिसच्या सहाव्या माळ्यावरूनच मारली उडी

ही तरुणी फक्त 21 वर्षांची आहे. सकाळी नेहमीप्रमाणे 9 वाजता ती ऑफिसला पोहोचली आणि थोड्याच वेळात त्याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत तिने आयुष्य संपवलं.

  • Share this:

हैदराबाद, 19 नोव्हेंबर : एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणीने (Hyderabad techie suicide) ऑफिसच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत ती तरुणी मृत्युमुखी पडली आहे. या तरुणीने आत्महत्या का केली याविषयी अद्याप उलगडा झालेला नाही. हैदराबादजवळची टेक सिटी सिकंदराबाद इथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ही तरुणी फक्त 21 वर्षांची आहे. टेक महिंद्रा सारख्या नामांकित कंपनीत ती नोकरीला होती. तिचं नाव सुश्मिता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सकाळी ती नेहमीप्रमाणे 9 वाजता ऑफिसला आली होती. पण त्यानंतर थोड्याच वेळात तिने याच ऑफिसच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. पोलिसांनी या घटनेत तिचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. पण आत्महत्या का केली, कुठली सुसाइट नोट तिने लिहून ठेवली आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांना काही प्रेमप्रकरणामुळे नैराश्य आल्याचा प्राथमिक संशय आहे. पण सुश्मिताच्या घरच्यांनी असं कुठलंच कारण फेटाळून लावलं आहे.

सुश्मिताला कुठलीही आर्थिक अडचण नव्हती. ती तरुण होती आणि नुकतीच नोकरीवर रुजू झाली होती. Coronavirus मुळे बंद असलेली आयटी कंपन्यांची कार्यालयं नुकतीच उघडली आहेत. अजूनही संपूर्णपणे कामाला सुरुवात झालेली नाही आणि अद्याप अनेक आयटी प्रोफेशनल्स घरून काम करत आहेत. त्यामुळे कार्यालयांच्या परिसरात नेहमी असते तेवढी गर्दी अजून दिसत नाही. त्यातच आता या आत्महत्येची बातमी कळल्यामुळे आयटी सिटीमध्ये खळबळ उडाली आहे.

तरुणांना येणारं नैराश्य आणि त्यातून आत्महत्येचं टोकाचं पाऊल या घटना वाढत आहेत. गेल्या सात महिन्यात कोविड काळात तर नैराश्यग्रस्त तरुणाईचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 19, 2020, 4:00 PM IST

ताज्या बातम्या