मराठी बातम्या /बातम्या /देश /

भयंकर! आधी आला धूर मग लागली आग, भररस्त्यात खासगी बसमध्ये अग्नितांडव

भयंकर! आधी आला धूर मग लागली आग, भररस्त्यात खासगी बसमध्ये अग्नितांडव

सलग दुसऱ्या दिवशी खासगी बसने भररस्त्यात पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बसमधून 26 प्रवासी प्रवास करत होते.

  • Published by:  Akshay Shitole

हैदराबाद, 13 मार्च : सलग दुसऱ्या दिवशी खासगी बसने भररस्त्यात पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बसमधून 26 प्रवासी प्रवास करत होते. अचानक या बसने पेट घेतल्यानं गोंधळ उडाला. 26 प्रवाशांना बसमधून तातडीनं खाली उतरवण्यात आलं. या दुर्घटनेमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. रामचंद्रपुरम गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. 26 प्रवाशांनी भरलेली ही बर हैदराबादहून मुंबईला निघाली होती. त्याचवेळी शुक्रवारी सकाळी रस्त्यात अचानक केशरी रंगाच्या खासगी बसमधून धूर येऊ लागला आणि अचानक पेट घेतला. आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. या सर्व प्रवाशांना बसमधून उतरवण्यात आलं असून त्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवण्यात आलं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

गुरुवारी सकाळी अशाच पद्धतीनं शिर्डीजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. बघता बघता ही आग इतकी वाढली की संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी आली होती. पुणे - नाशिक महामार्गावर चंदनापुरी शिवारातील जावळे वस्ती इथे ही दुर्घटना घडली होती. आग लागताच बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

हे वाचा-IPLमध्ये कोहलीच्या संघात खेळणाऱ्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

हे वाचा-‘कोरोना’चा कहर : दफनविधीसाठी इराणमध्ये रात्रीतून मैदानात खोदल्या जाताहेत ‘कबर’

First published:

Tags: Bus fire, Hydrabad