पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींवर लवकरच तोडगा काढू - अमित शहा

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींवर लवकरच तोडगा काढू - अमित शहा

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी, तसेच रुपयाची घसरण थांबवण्याच्या दृष्टीने काय उपाय करता येईल यावर विचार सुरू असून, केंद्र सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

  • Share this:

हैद्राबाद, 15 सप्टेंबर - पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी, तसेच रुपयाची घसरण थांबवण्याच्या दृष्टीने काय उपाय करता येईल यावर विचार सुरू असून, केंद्र सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमागेही आंतरराष्ट्रीय कारणं असल्याचे ते म्हणाले.

हैद्राबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शहा यांनी पत्रकारांना माहिती दिली. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत बोबतांना त्यांनी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचीही घसरण सुरू असल्याचे मान्य करत, त्याबाबत चिंता व्यक्त केली. अमेरिका आणि चीन यांच्यातले व्यावसायिक युद्ध आणि अमेरिकेचे जगातील अन्य तेल उत्पादक देशांशी असलेले संबंध यांच्यातील संबंधांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्यांचं त्यांनी सांगितले. आणि त्य़ावर लवकरात लवकर तोडगा काढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अन्य देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमुल्यन झाले असले तरी त्यामुळे देशाचे झालेले आर्थिक नुकसान कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.

इंधनाचे दर काँग्रेसच्या काळात वाढले की मोदी सरकारच्या ?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्यांच्या खिश्याला चांगलीच कात्री लागलीये. त्यामुळे विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला होता. काँग्रेससह 21 पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेस एकीकडे पेट्रोल आणि डिझेलला जीएसटी अंतर्गत आणावे अशी मागणी करत आहे. तर दुसरीकडे सरकार इंधनदरवाढीवर बचाव करत आहे.

इंधन दरवाढीवरून राजकारण तापले असताना सोशल मीडियावर एनडीए आणि यूपीए सरकारने कशाप्रकारे इंधनाच्या किंमतीत वाढ केली याबद्दल दोन्ही बाजूने चर्चा होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही आकडे असं सांगताय की, यूपीए सरकारची तुलना एनडीए सरकारबरोबर होत आहे. अशीही चर्चा आहे की एनडीए सरकारच्या काळात इंधनाच्या दरात वाढ झालीये.

 बाॅलिवूड स्टार्सनी बाप्पाचं स्वागत केलं जल्लोषात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2018 11:54 PM IST

ताज्या बातम्या