Home /News /national /

लग्नासाठी मुलींचं किमान वय 21 होण्याची चर्चा, मशिदींबाहेर 'निकाह'साठी लागल्या रांगा

लग्नासाठी मुलींचं किमान वय 21 होण्याची चर्चा, मशिदींबाहेर 'निकाह'साठी लागल्या रांगा

केंद्र सरकार मुलींच्या लग्नाचे किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे देशातील बहुतांश लोक या निर्णयाचे स्वागत करत असताना, कित्येक जण याला विरोधही करत आहेत.

हैदराबाद, 04 जानेवारी: केंद्र सरकार मुलींच्या लग्नाचे किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे देशातील बहुतांश लोक या निर्णयाचे स्वागत करत असताना, कित्येक जण याला विरोधही करत आहेत. तर हा कायदा (New Marriage Law) लागू होण्याच्या भीतीने हैदराबादमध्ये 2022 या वर्षात होणारे विवाहदेखील लगबगीने उरकले जात असल्याचे चित्र दिसत आहे. मुस्लिम धर्मगुरू आणि अमरत-ए-मिल्लत-ए-इस्लामिया या संघटनेचे तेलगंणा आणि आंध्र प्रदेशचे प्रमुख मौलाना जफर पाशा यांनी या बाल विवाह प्रतिबंध (सुधारित) विधेयकाला विरोध (Prohibition of Child Marriage Amendment Bill) दर्शवला आहे. इस्लाममध्ये मुस्लिम मुलींना वयात आल्यानंतर लगेच लग्न करण्याची परवानगी आहे. जर हे विधेयक मंजूर झाले, तर मुलींच्या सुरक्षेसंबंधी बरेच प्रश्न निर्माण होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर ओल्ड हैदराबादमध्ये कित्येक मशीदींमध्ये निकाहसाठी मोठमोठ्या रांगा (Mosques flooded in Old City Hyderabad) लागल्या आहेत. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वीच कित्येकांना आपल्या मुलींची लग्नं उरकून घ्यायची आहेत, असे चित्र आहे. नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. हे वाचा-पँगाँग तलावावर पूल बांधत आहे चीन, सॅटेलाइट फोटोंमुळे धक्कादायक खुलासा- रिपोर्ट काय आहे मुलींच्या पालकांच्या समस्या? या मीडिया अहवालानुसार, समरून्निसा यांच्या 19 वर्षीय मुलीचा डिसेंबर 2021 मध्ये साध्या पद्धतीने विवाह झाला. त्यांनी सांगितले, 'माझ्या तीन मुली आहेत, ज्यांपैकी एक दिव्यांग आहे. कायदा झाल्यानंतर मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी दोन वर्षं थांबावं लागेल. मी त्यांपैकी एकीच्या लग्नासाठी आणखी दोन वर्षं वाट पाहू शकत नाही.' तर बाबानगरच्या एका व्यक्तीने सांगितले, 'आमच्या कुटुंबातील मुलीचं लग्न 2022 मध्ये करण्याचा विचार करत होतो. तिचे वडील नोकरीच्या शोधात श्रीलंकेला गेले होते, जेणेकरून लग्नापर्यंत पैशांची व्यवस्था होऊ शकेल. मात्र या विधेयकाबाबत माहिती मिळाल्यामुळे लग्नासाठी आम्ही घाई करत आहोत.' ओल्ड सिटीमधील अजीज अहमद यांनी सांगितले, 'माझा मोठा भाऊ आणि वहिनी दोघेही हयात नाहीत. त्यांच्या 18 वर्षांच्या मुलीची देखभाल सध्या आजी करत आहे. आता जर हा कायदा लागू झाला, तर पुढील तीन वर्षं तिचा सांभाळ कोण करेल?' शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी घाई तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी 2014 साली ‘शादी मुबारक’ ही योजना (Shaadi Mubarak Scheme) जाहीर केली होती. या योजने अंतर्गत एससी, एसटी आणि ईबीसी या अल्पसंख्यांकांना मुलींच्या लग्नासाठी 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. यासाठी मुलीचे वय कमीतकमी 18 वर्षं असायला हवं. या योजनेसाठी तातडीने अर्ज करता यावा यासाठीदेखील कित्येक लोक आपल्या मुलींची लग्नं लावून मोकळे होत आहेत. ओल्ड सिटीमधील (Marriages in Old City) स्थानिक नेते फिरोज खान यांनी सांगितलं, की या भागात येत्या काही दिवसांमध्ये सुमारे 40 निकाह पार पडणार आहेत. हे वाचा-ऑनलाइन गेममुळे दोन भाऊ बेपत्ता; मोबाइल फोनचं व्यसन कुटुंबावर पडलं भारी लग्न आता, मात्र पाठवणी नंतर कित्येक कुटुंबीय मुलीचं लग्न घाईत उरकत असले, तरी विदाई म्हणजेच पाठवणी मात्र लांबणीवर टाकत आहेत. रमहत अली नावाच्या व्यक्तीची कोरोना काळात नोकरी गेली होती. यामुळे मुलीच्या लग्नानंतर तो तिच्यासोबत हुंड्यात फर्निचर, सोफा, कपडे आणि काही रक्कम देऊ शकत नाही. यामुळे त्याने तिचे लग्न आताच उरकले असले, तरी पाठवणीसाठी आणखी चार-पाच महिन्यांची मुदत मुलींच्या सासरच्यांकडे मागितली आहे, असं त्यानी सांगितलं. ओल्ड सिटीमधील बऱ्याच कुटुंबांची स्थिती अशीच आहे. एकूणच, हैदराबादमध्ये 18 ते 20 वर्षांच्या मुलींची लग्नं उरकून टाकण्याचा झपाटा सुरू आहे. या सर्वांचे निकाह 2022-23 या वर्षी होणार होते. मात्र नवीन कायदा लागू होण्याच्या भीतीने सध्या लोक स्थानिक मशि‍दींमध्ये तडकाफडकी निकाह करून घेत आहेत.
First published:

Tags: Hyderabad, Wedding

पुढील बातम्या