हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपींनीच केली गाडी पंक्चर आणि...

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपींनीच केली गाडी पंक्चर आणि...

पोलिसांनी या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद आरिफ, नवीव, चिंताकुंता केशावुलु आणि शिवा अशी आरोपींची नावं आहेत.

  • Share this:

हैदराबाद, 30 नोव्हेंबर : हैदरबादच्या डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद आरिफ, नवीव, चिंताकुंता केशावुलु आणि शिवा अशी आरोपींची नावं आहेत. हे घाणेरडं कृत्य करण्यासाठी आरोपींनी डॉक्टर महिलेला जाळ्यात ओढण्यासाठी तिची स्कूटी पंक्चर केली होती असा खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपींनी महिला डॉक्टरला टोल प्लाजाजवळ स्कूटी पार्क करताना पाहिलं होतं. त्यानंतर आरोपी शिवाने स्कूटीची हवा काढून टाकली. जेव्हा महिला डॉक्टर ड्यूटी पूर्ण करून घरी जाण्यासाठी निघाली तेव्हा पाहिलं तर स्कूटी पंक्चर होती. खूप रात्र झाल्यामुळे महिलेने छोट्या बहिणीला फोन केला आणि गाडी खराब झाल्याची माहिती दिली. बरं इतकंच नाही तर खूप भीती वाटत असल्याचं महिला डॉक्टरने बहिणीला सांगितलं.

पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, छोट्या बहिणीने स्कूटी तिथेच ठेऊन कॅबने घरी येण्याचा सल्ला बहिणीला दिला. त्यामुळे आरोपी चिंताकुंता केशावुलु आणि शिवा महिला डॉक्टरांची मदत करण्यासाठी तिथे पोहोचले. शिवा स्कूटी ठीक करण्याच्या बहानान्या महिलेलाल लांब घेऊन गेला जिथे इतर आरोपी बसले होते. तिथे जाताच आरोपींनी तिला बंधक केलं.

सामूहिक बलात्कार करण्याआधी महिलेला पाजली दारू...

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बलात्कार करण्याआधी दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी महिला डॉक्टरलाही खूप दारू पाजली होती. त्यानंतर आरोपी मोहम्मद आरिफने महिलेचे तोंड, हात आणि पाय बांधले. त्यानंतर आरोपींनी महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला. श्वास घेण्यासाठी त्रास झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री 9.35 ते 10 वाजताच्या दरम्यान झाली. घटना घडल्यानंतर आरोपींनी महिला डॉक्टरच्या मृतदेहाला ट्रकमध्ये ठेऊन पुढे घेऊन गेले. आणि रस्त्यामध्ये पेट्रोल पंपातून पेट्रोल विकत घेतलं. त्यानंतर फ्लायओव्हरच्या खाली अंधारात मृतदेहाला फेकून, त्यावर पेट्रोल ओतून जाळण्यात आलं.

सगळ्यात आधी शेतकऱ्याने पाहिला मृतदेह

महिला डॉक्टर हैदराबाद-बंगळुरू हायवेवर असलेल्या टोल प्लाजाजवळ शेवटची दिसली होती. तिथून तब्बल 30 किमी लांब एका शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी जळालेला अवस्थेत पुलाच्या खाली मृतदेह पाहिला. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. हरवलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांना घटनास्थळी बोलावले. अर्धजळालेला स्कार्फ आणि सोन्याच्या पेंडेंटवरून डॉक्टर महिलेची ओळख पटली.

घटनास्थळी सापडल्या दारूच्या बाटल्या...

पोलिसांना परिसरातून दारूच्या बाटल्याही सापडल्या. जवळपासच्या लोकांनी पोलिसांच्या या ठिकाणी बर्‍याच दिवसांपासून उभ्या असलेल्या ट्रकबद्दलही सांगितले. ट्रकच्या आधारे तपास सुरू केला असता हा ट्रक राजेंद्र नगर येथे राहणार्‍या एका व्यक्तीचा होता. सायबराबादचे पोलिस आयुक्त व्हीसी सज्जनार म्हणाले की, लोकांची चौकशी आणि सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींना अटक केली गेली. ही घटना संपूर्ण षडयंत्रांतर्गत घडविण्यात आली असून यात चारही आरोपींचा सहभाग होता. संपूर्ण चौकशी आणि पुरावांच्या आधारे कोर्टाने या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी संतप्त जमावाने आरोपींना घेऊन जाताना त्यांच्यावर मारहाण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2019 06:39 PM IST

ताज्या बातम्या