कचराकुंडीत झोपलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना जिवंत जाळलं, तिघांचा मृत्यू

कचराकुंडीत झोपलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना जिवंत जाळलं, तिघांचा मृत्यू

काही दिवसांआधीही हैदराबादमध्ये १०० कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आल्याची घटना घडली होती.

  • Share this:हैदराबाद, 06 नोव्हेंबर : कचराकुंडीत झोपलेल्या चार कुत्र्यांच्या पिल्लांना जिवंत जाळून देण्याची संतापजनक घटना हैदराबाद येथील मौला अली भागात घडली आहे. या घटनेत चार पैकी तीन पिल्लांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी पिल्लावर प्राण्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.


ही घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर वन्य प्राणी संघटनेच्या सदस्यांनी सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये काही अज्ञात लोकांनी पिल्लांना जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला.


पोलिसांनी या कुत्र्यांसोबत करण्यात आलेल्या क्रुर प्रकारानंतर गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांच्या तपासात काही समाजकंटकांनी हे कृत्य केल्याचं समोर आले आहे. या समाजकंटकांनी चार पिल्लांना पेटवून एका मोकळ्या जागेत फेकून दिलं. त्यानंतर तीन पिल्लांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी पिल्लांला वाचवण्यात आले आहे.


काही दिवसांआधीही हैदराबादमध्ये १०० कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आल्याची घटना घडली होती.


================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2018 08:24 PM IST

ताज्या बातम्या