FACEBOOK गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी निघाला स्वित्झर्लंडला, आता आहे पाकिस्तानच्या तुरुंगात!

FACEBOOK गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी निघाला स्वित्झर्लंडला, आता आहे पाकिस्तानच्या तुरुंगात!

प्रशांत वैंदम हे पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. ते मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, प्रशांत आपल्या फेसबूकवर मैत्री झालेल्या प्रेयसीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला जाण्यासाठी निघाला होते. परंतु...!

  • Share this:

हैदराबाद, 19 नोव्हेंबर : घुसखोरीच्या आरोपावरून सोमवारी दोन भारतीयांना अटक केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. त्यातील एक हैदराबादचे असून प्रशांत वैंदम असं त्यांचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत वैंदम हे पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. ते मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार,  प्रशांत आपल्या फेसबूकवर मैत्री झालेल्या प्रेयसीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला जाण्यासाठी निघाला होते. परंतु ते चुकून पाकिस्तानमध्ये पोहोचले. आणि आता ते चोलिस्तानच्या तुरूंगात आहेत.

बहावलपूर जवळील चोलीस्तान येथे दोन भारतीय नागरिकांना वैध कागदपत्रांशिवाय अटक केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी सोमवारी केला. प्रशांत व्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.  नाव वारी लाल असं त्यांचं नाव आहे.

इतर बातम्या - 2 मुलांचा आधार गेला, भर रस्त्यात पेट्रोल ओतून व्यक्तीची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत वैंदम बरेच दिवसांपासून फेसबुकवर एका मुलीला डेट करत होते. या दोघांमध्ये भेट झाल्याची चर्चा होती. यानंतर प्रशांतने प्रेयसीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला जाण्याचे सांगितले होते. आता ते पाकिस्तानात कसे पोचले या चौकशीत पोलिस गुंतले आहेत.

सोमवारी रात्री उशिरा प्रशांतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात ते तेलगूमध्ये आपल्या पालकांशी बोलत आहेत आणि म्हणाले की, एका महिन्यातच पाकिस्तानच्या तुरूंगातून सुटण्याची आशा आहे. पण , व्हिडिओमध्ये प्रशांतने तो पाकिस्तानात कसा पोहोचला हे सांगितले नाही.

First Published: Nov 19, 2019 03:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading