• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 7 वर्षांत 117 वेळा मिळालं Challan, एकदाही भरले नाही पैसे, पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

7 वर्षांत 117 वेळा मिळालं Challan, एकदाही भरले नाही पैसे, पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

हैदराबादमधून (Hyderabad) एक आगळीवेगळी बातमी समोर येत आहे. हैदराबादमध्ये एका स्कूटर (scooter driver) चालकाला तब्बल 117 वेळा चालान (challan 117 times) पाठवल्याचं समजतंय.

 • Share this:
  हैदराबाद, 17 नोव्हेंबर: हैदराबादमधून (Hyderabad) एक आगळीवेगळी बातमी समोर येत आहे. हैदराबादमध्ये एका स्कूटर (scooter driver) चालकाला तब्बल 117 वेळा चालान (challan 117 times) पाठवल्याचं समजतंय. पोलिसांनी या चालकाला आता अटक केली आहे. नियमित वाहन तपासणी दरम्यान, हैदराबाद वाहतूक पोलिसांनी (Hyderabad traffic police) एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. जो गेल्या 7 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत आहे. त्याला 7 वर्षात 117 चालान पाठवले. मात्र तो ते चालान भरण्यात यशस्वी झाला. त्याला आतापर्यंत सुमारे 30 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. फरीद खान असे या व्यक्तीचे नाव असून तो स्कूटी चालवतो. त्याला आतापर्यंत 30 हजार रुपयांचं चालान पाठवण्यात आलं आहे. त्याला नामपल्लीजवळ हेल्मेटशिवाय गाडी चालवताना पकडलं आणि जेव्हा वाहतूक पोलिसांनी त्याची नोंदणी तपासली तेव्हा त्याच्या वाहनातून 29,720 रुपये किंमतीची 117 चालान कापण्यात आल्याचं आढळून आलं. हेही वाचा- नाल्यात वाहून जाणाऱ्या नवजात बाळाचा थरार, मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण फरीद खाननं 7 वर्षात एकदाही दंड भरला नाही. पोलिसांनी आता त्याची स्कूटी जप्त केली आणि प्रलंबित चालान भरल्यानंतर फरीद खानला त्याची स्कूटी परत घेऊन जाण्यास सांगितलं आहे. खान यांना कायदेशीर नोटीसही पाठवून चालान भरण्यास सांगितलं होतं. त्या नोटीसमध्ये चालानचे पैसे भरण्यास सांगितलं होतं. नाहीतर तुमचे वाहन जप्त करण्यासाठी आरोपपत्र दाखल केले जाईल. आता पोलिसांनी त्याचे वाहन जप्त केलं असून त्याला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, जर त्याला त्याचे वाहन परत हवे असेल तर व्याजासह दंड भरावा लागेल. मोटार वाहन (MV) कायद्यानुसार, जर एखाद्याला 10 पेक्षा जास्त वेळा चालान मिळाल्यानंतर दंड भरला नाही, तर पोलीस त्याचे वाहन जप्त करू शकतात. हेही वाचा- Kolhapur: दागिने लुटण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल; कारनामा वाचून लावाल डोक्याला हात ई-चालान वेबसाइटनुसार, 2014 पासून जारी करण्यात आलेली बहुतांश चालान हेल्मेटशिवाय किंवा चुकीच्या पार्किंगमुळे जारी करण्यात आली होती. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना फेस मास्क न घालण्याशी संबंधित काही चालान होते. काही चालान चुकीच्या दिशेनं गाडी चालविण्याशी संबंधित आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: