टीव्ही चॅनलवर बोलताना तरुणानं बलात्काराला धर्माशी जोडंल, अँकर भडकला; पाहा VIDEO

टीव्ही चॅनलवर बोलताना तरुणानं बलात्काराला धर्माशी जोडंल, अँकर भडकला; पाहा VIDEO

महिलांना समान हक्क कधी मिळणार? असा प्रश्न अँकरने विचारल्यानंतर तरुणाने दिलेल्या उत्तरवर भडकला अँकर

  • Share this:

नवी दिल्ली, 14 डिसेंबर: देशात बलात्काराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नसताना बलात्काराच्या घटनांना धर्मिकतेचा रंग देण्यात येत असेल तर त्यासारखं विदारक वास्तव दुसरं नाही. महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात देशभरातून वेगवेगळ्या मध्यमातून निदर्शनं केली जात आहेत. यावेळी न्यूज 18 इंडियावर याच विषयी सुरू असलेल्या एका चर्चेदरम्यान एका मुस्लीम गेस्टनी आपलं मत मांडताना बलात्काराला धार्मिकतेचा रंग दिला आहे. त्यामुळे चर्चेत सर्व महिलांसर इतर पॅनलिस्टने गोंधळ सुरू केला आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.

चर्चेदरम्यान कोणता प्रश्न विचारण्यात आला होता?

महिलांना पुरुषांप्रमाणे समान हक्क कधी मिळणार असा चर्चेदरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नानंतर मुस्लीम पॅनलिस्टने उत्तर देताना उत्तर प्रदेशात झालेल्या बलात्काराचं उदाहरण देत आपलं मत मांडलं. उत्तर प्रदेशात दोन हिंदू बहिणींचा बलात्कार झाला. त्याच्या या वक्तव्यानंतर होस्ट करणारा अँकर भडकला. बलात्कार हा बलात्कार असतो. त्यामध्ये हिंदू किंवा मुस्लीम किंवा धर्म येत नाही. असं विधान करण्याआधी तुम्ही विचार करायला हवा होता. बलात्काराला धर्मासोबत जोडलं जाऊ शकतं नाही. चर्चा सत्रात या मुद्द्यावर घमासान झालं मात्र मुस्लीम पॅनलिस्टच्या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. आरोपींविरोधात सोशल मीडियापासून ते रस्त्यावर उतरण्यापर्यंत विविध पद्धतीची निदर्शनं करण्यात आली होती. त्यानंतर उन्नव इथे पीडित महिलेला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी सकाळी पुन्हा एकदा 18 वर्षीय युवतीवरील झालेल्या बलात्कारामुळे हैदराबाद हादरलं. एका रिक्षा चालकाने 18 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना 8 डिसेंबरला घडली होती. त्याआधी दोन दिवस हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. त्यानंतर झालेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

वाचा-साईंच्या शिर्डीमध्ये एक-एक करून गायब होतायत लोक, उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत आजीच्या घरी जात असताना हा प्रकार घ़डला होता. त्यावेळी रस्ता विसरल्यानंतर आरोपीच्या भावाने त्या दोन मुलींना पाहिलं. रिक्षाचालक असलेल्या आरोपीच्या भावाने त्या दोन्ही मुलींना घेऊन स्वत:च्या घरी पोहोचला. तेव्हा त्याच्या आईने मुलींना घरी सोडण्यासाठी लहान भावाला पाठवलं. तेव्हा त्याने मुलींना घरी घेऊन न जाता परिसरातील एका लॉजवर नेलं. लहान मुलगी झोपताच मोठ्या बहिणीवर नराधमाने बलात्कार केला. त्यानंतर रेल्वे स्थानकावर त्या दोघींना सोडून तो फरार झाला. त्यानंतर पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना फोन केला. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार अरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. तर दुसरीकडे अशा पद्धतीनं बलात्काराला धर्मासोबत जोडून धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 12:19 PM IST

ताज्या बातम्या