सिग्नल तोडला अन् मृत्यूनं गाठलं! सुसाट कार ट्रकवर आदळली, सॉफ्टवेअर इंजिनियरसह 4 जणांचा मृत्यू

सिग्नल तोडला अन् मृत्यूनं गाठलं! सुसाट कार ट्रकवर आदळली, सॉफ्टवेअर इंजिनियरसह 4 जणांचा मृत्यू

हा भयंकर अपघात हैदराबादमध्ये झाला आहे. या अपघातात सॉफ्टवेअर इंजिनीअरसह चार जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

  • Share this:

हैदराबाद, 13 डिसेंबर : अनेकवेळा वाहतुकीचे नियम सांगून किंवा दंड भरायला लावूनही पाळले जात नाहीत. असाच नियम मोडणं तरुणांना खूप महागात पडलं आहे. रात्रीच्या वेळी सिग्नल तोडून सुसाट वेगानं जाणारी कार समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकवर आदळी आणि घात झाला. सिग्नल तोडून सुसाट वेगानं पळ काढणाऱ्या तरुणांना थेट मृत्यूनं गाठलं.

ही संपूर्ण घटना रस्त्यावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की सिग्नल लागला आहे. एक गाडी उभी आहे. तर दुसरी मागून येणारी कार हा सिग्नल तोडून सुसाट पुढे जाणार तेवढ्यात समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे.

हे वाचा-पोलीस स्टेशन असावं तर असं! कैद्यानं थेट गुगलवर दिलं 5 स्टार रेटिंग

हा भयंकर अपघात हैदराबादमध्ये झाला आहे. या अपघातात सॉफ्टवेअर इंजिनीअरसह चार जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधापूर येथील वसतिगृहात राहणारे पाच तरुण पहाटे तीनच्या सुमारास कारमधून जात होते. त्याच वेळी, ओव्हर स्पीडमध्ये, विप्रो सर्कल गुचीबोव्हलीवर लाल सिग्नल असतानाही त्यांनी तो तोडून गाडी सुसाट वेगानं पुढे नेली.

सिग्नलवरून वेगानं जात असताना दोन सेकंदात समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकवर ही गाडी आदळली. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली होती. रस्त्याच्या कडेला पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेला शेड पूर्णपणे नष्ट झाला. सर्व मृतांची ओळख आंध्र प्रदेशने केली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 13, 2020, 1:24 PM IST

ताज्या बातम्या