मराठी बातम्या /बातम्या /देश /

अक्षरशः एका क्षणाच्या फरकाने 'ती' वाचली, VIDEO बघून तुमचाही विश्वास बसणार नाही!

अक्षरशः एका क्षणाच्या फरकाने 'ती' वाचली, VIDEO बघून तुमचाही विश्वास बसणार नाही!

रस्त्यावरून चालताना लगतची भिंत बघत बघता धाडकन कोसळली. त्याखाली जिवंत गाडली गेली असती पादचारी महिला. हा क्षण CCTV VIDEO मध्ये स्पष्ट दिसत आहे.

हैदराबाद, 14 ऑक्टोबर : अतिपावसामुळे खचलेली संपूर्ण भिंत एका क्षणात कशी खाली येते आणि फक्त दैव बलवत्तर म्हणून अवघ्या क्षणाच्या अंतराने महिलेचा कसा जीव वाचला, याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्ध्या सेकंदाचा विलंब झाला असता किंवा या महिलेचं एक पाऊल लवकर पडलं असतं, तर अक्षरशः ती जिवंत गाडली गेली असती, याची साक्ष देणारा हा क्षण CCTV कॅमेऱ्यामुळे लक्षात आला. हा VIDEO आहे हैदराबादमधला.

संपूर्ण तेलंगण राज्यात आणि राजाधानी हैदराबादेत मंगळवारपासून तुफानी पावसाचं थैमान सुरू आहे. बुधवारी दुपारनंतर पाऊस थोडा कमी झाली. ही संधी साधून बाहेर पडलेल्या एका महिलेचा जीव अक्षरशः थोडक्यात वाचला. जुन्या हैदराबाद शहरातल्या हरीबावली भागातली ही घटना आहे. या भागात कालपासून तुफान पाऊस सुरू होता. यामुळे खचलेली एक जुनी मोठी सीमाभिंत एका क्षणात कोलमडली. त्याचवेळी एक पादचारी महिला या भिंतीजवळून जात होती. भिंत कोसळतेय हे लक्षात येताच ती धावत दूर झाली. त्यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला हे CCTV फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. या महिलेला रुग्णालयात दाखल केलं. तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

तेलंगण आणि आंध्र प्रदेशात मंगळवारपासून तुफान वादळी पाऊस झाला. अनेक भागांना पुराने वेढलं. या तुफानी पावसाने हैदराबादमध्ये आतापर्यंत किमान 15 जणांचा जीव गेला आहे. यातल्या तिघांचे मृत्यू अंगावर भिंत पडूनच झाले. या पार्श्वभूमीवर या महिलेचा जीव ज्या प्रकारे वाचला, तो चमत्कारच म्हणावा लागेल. गाड्याच्या गाड्या, वाहनं, घरातल्या वस्तू वाहत जातानाचे VIDEO समोर येत आहेत. NDRF च्या टीमने शंभरावर लोकांचा जीव वाचवला. बंगालच्या उपसागराकडून आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाचे हे वादळी परिमाण आहेत. महाराष्ट्रातही पुढचे दोन दिवस याच कारणाने मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

First published:

Tags: Hyderabad, Viral video.