घरी जायला कॅब मिळत नव्हती, या तरुणानं लढवली नामी शक्कल; Zomato ride ची आयडिया इंटरनेटवर हिट

घरी जायला कॅब मिळत नव्हती, या तरुणानं लढवली नामी शक्कल; Zomato ride ची आयडिया इंटरनेटवर हिट

मॉलमधून घरी जाण्यासाठी कॅब किंवा रिक्षा मिळत नव्हती. या तरुणाने लढवलेली शक्कल लढवलेली पाहा. तुम्हीही म्हणाल... what an idea Sir ji. या तरुणाची पोस्ट व्हायरल झाली आणि नेटकऱ्यांनी भरभरून दाद दिली.

  • Share this:

हैदराबाद, 16 ऑगस्ट : रात्रीचे बा!रा वाजायला आले आहेत, एका मॉलमधून तुम्ही घरी जाण्यासाठी कॅबच्या शोधात आहात... खूप वेळ झाला एकही रिक्षा, ऑटो, टॅक्सी कॅब(Ola, Uber)काहीच मिळत नाही... रिक्षावाले तुमच्या एरियात यायला नकार देतात, Uber चे रेट गगनाला भिडतील एवढे जास्त येतात... ही परिस्थिती कुठल्याही शहरात अनुभवली असेलच. त्यावर या तरुणाने काय शक्कल लढवली पाहा.. त्याने नुसता उपाय शोधला नाही, एकाच दगडात दोन पक्षी मारून चक्क फ्री राईड मिळवून घरी पोहोचला... कसा? त्याची ही Facebook पोस्ट पाहा.

हा अनुभव शेअर केलाय ओबेश कोमिरीशेट्टी यानी. हा तरुण हैदराबादचा आहे. त्याने स्वतःच गेल्या महिन्यातला अनुभव शेअर केला आहे. हैदराबादच्या इनॉर्बिट मॉल रोडवर तो रात्री घरी जाण्यासाठी कॅब किंवा ऑटो शोधत होता.

हे वाचा- ‘म्हणजे टीम इंडिया आणखी एक वर्ल्ड कप हरणार?’, रवी शास्त्रींवरचे Memes व्हायरल!

त्याने Uber App वर कॅब बुक करायचा प्रयत्न केला. पण एका राईडसाठी 300 रुपयांवर खर्च उबर दाखवत होतं. प्रत्यक्षात ओबेशचं घर फारसं लांब नव्हतं. भूकही लागली होती. त्यातच त्याने एक कल्पना लढवली. त्याने मोबाईलवर Zomato अॅप उघडलं आणि त्याच्या जवळच्या एका रेस्टॉरंटमधून डोसा ऑर्डर केला. डिलीव्हरी अर्थातच घरच्या पत्त्यावर मागवली. अॅपवरून ऑर्डर केल्याबरोबर तो त्या रेस्टॉरंटजवळ जाऊन उभा राहिला.

पाहा VIDEO महापुराआधीच भटक्या कुत्र्यांनी गाव का सोडलं, त्यांना लागली होती चाहूल?

थोड्याच वेळात झोमॅटोचा डिलीव्हरी बॉय त्याची ऑर्डर घेऊन जाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आलेला त्याला दिसला. त्यानं डोशाचं पार्सल उचललं तेवढ्यात ओबेश त्याच्यापुढे जाऊन उभा राहिला आणि त्याला हे पार्सल आपलंच असल्याचं सांगत, ते घरी पोहोचवण्याची विनंती केली आणि सोबत मलाही घरी सोड अशीही विनंती केली. Zomato च्या फूडबरोबर अशी फ्री राईडही ओबेशने मिळवली. त्या डिलीव्हरी बॉयने त्याच्या ऑर्ड़रसह घरी सोडलं.

ओबेशने हा अनुभव लिहिल्यानंतर त्याची पोस्ट भराभर व्हायरल झाली. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या कल्पनेला मनसोक्त दाद दिली. भारतीय जुगाडू वृत्तीचं कौतुक काहींनी केलंय, तर काहींनी याचं सोन्यासारखं उत्तर असं म्हणत स्वागत केलंय. गंमत म्हणजे झोमॅटोनंसुद्धा याची दखल घेतली. त्यांनी ट्विटरवर या पोस्टला दाद देत या तरुणाला 'जीनिअस' असं म्हटलं आहे. आधुनिक काळातल्या प्रॉब्लेमवर आधुनिक सोल्युशन असं वर कौतुकही केलं.

हेही वाचा - आशा भोसलेंनी पाकिस्तानला असं केलं ट्रोल, नेटकरी झाले खूश

VIDEO : राणेंचा शिवसेना सोडण्याचा निर्णय आणि 'त्या' 2 चिठ्ठ्या, शरद पवारांची तुफान टोलेबाजी

First published: August 16, 2019, 9:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading