Home /News /national /

''घर का न घाट का'', Girlfriend च्या नादात झाला कर्जबाजारी; पळून गेलेला पती घरी परतातच पत्नीनं शिकवला धडा

''घर का न घाट का'', Girlfriend च्या नादात झाला कर्जबाजारी; पळून गेलेला पती घरी परतातच पत्नीनं शिकवला धडा

विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) ठेवू पाहणाऱ्या या व्यक्तीला त्याच्या पत्नीनं एकप्रकारे धडा शिकवल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

हैदराबाद, 19 एप्रिल: हिंदी भाषेतली `धोबी का कुत्ता घर का न घाट का`, तर मराठी भाषेतली `एक ना धड भाराभर चिंध्या`, या दोन्ही म्हणी हैदराबादमधल्या एका विवाहित पुरुषाच्या (Married Man) वागण्याला अगदी चपखल बसतात. एका विचित्र कृत्यामुळे तो ना प्रेयसीचं मन जिंकू शकला ना पत्नीचं. तेलंगणाची (Telangana) राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) एका महिलेचा पती घर सोडून दुसऱ्या विवाहित महिलेसोबत पळून गेला. प्रेयसीचा (Girlfriend) रोजचा खर्च परवडत नसल्याचं कारण देत तो काही दिवसांतच पुन्हा घरी परतला. मात्र पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळीच्या मदतीनं या व्यक्तीनं पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा हा प्रयत्नदेखील अयशस्वी ठरला असून, पत्नी तिच्या निर्णयावर ठाम आहे. विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) ठेवू पाहणाऱ्या या व्यक्तीला त्याच्या पत्नीनं एकप्रकारे धडा शिकवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ही व्यक्ती प्रेयसीचा खर्च परवडत नसल्याचं कारण देत असून, त्यामुळे त्याला त्याच्या पत्नीकडे परत यायचं आहे. तो त्याच्या पत्नीला सोबत राहण्याची विनवणी करत आहे, असं पोलिसांनी सांगितलं. हैदराबादमधल्या कुकटपल्ली भागात हे दाम्पत्य दोन मुलांसह आनंदानं राहत होतं. दरम्यान, गेल्यावर्षी महिलेच्या पतीची ओळख एका विवाहित महिलेशी झाली. त्यानंतर या दोघांचा व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद सुरू झाला. दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोन महिन्यांपूर्वी महिलेचा पती त्याच्या विवाहित प्रेयसीसोबत घरातून पळून गेला होता. त्यानंतर पत्नीनं पोलीस ठाण्यात पती बेपत्ता (Missing) झाल्याची तक्रार दिली. `तुमचे वडील कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत,` असं या महिलेनं तिच्या मुलांना सांगितलं. मात्र, महिलेच्या पतीने एक दिवस अचानक सायबराबाद पोलिसांशी संपर्क साधला आणि आपल्याकडून चूक झाल्याची माहिती दिली. माझ्या पत्नीची समजूत काढावी, जेणेकरून मी पुन्हा तिच्याकडे जाऊ शकेन, अशी विनंती त्याने यावेळी केली. या व्यक्तीनं आपल्या प्रेयसीच्या लाईफस्टाईलविषयीदेखील माहिती दिली, असं पोलिसांनी सांगितलं. सिबिल स्कोअर तातडीने सुधारण्यासाठी करा `या` गोष्टी  हा नवरा पोलिसांना म्हणाला, ``एका महिन्यात प्रेयसीच्या नाश्ता ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा सर्व खर्च भागवण्यासाठी मला 10 लाख रुपयांचं कर्ज (Loan) घ्यावं लागलं. पण या पुढे मला जास्त खर्च करणं शक्य नसल्यानं मी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतला.`` या व्यक्तीने त्याच्या घरातल्या काही ज्येष्ठ सदस्यांच्या मदतीनं पत्नीचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Hyderabad

पुढील बातम्या