हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणात समोर आलं नवं CCTV फुटेज, आरोपींना पकडण्यात महत्त्वाची भूमिका

हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणात समोर आलं नवं CCTV फुटेज, आरोपींना पकडण्यात महत्त्वाची भूमिका

या फुटेजच्या आधारेच आरोपींना बेड्या ठोकण्यास मदत झाली होती.

  • Share this:

हैदराबाद, 10 डिसेंबर : हैदराबादमध्ये झालेल्या डॉक्टर तरूणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देश हादरून गेला. याच प्रकरणातील एक नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. या फुटेजच्या आधारेच आरोपींना बेड्या ठोकण्यास मदत झाली होती. हे फुटेज हैदराबादमधील शमशाबाद येथील आहे.

हैदराबादमधील तरुणीच्या हत्येनंतर शमशाबाद इथं 27 नोव्हेंबरच्या रात्री या प्रकरणातील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले होते. एका टोलनाक्याजवळ ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनरने डॉक्टर तरुणीला पळवून नेलं. तसंच बलात्कारानंतर तिचा मृतदेह टोलनाक्यापासून बऱ्याच अंतरावर नेऊन पेट्रोल आणि डिझेल टाकून जाळला. या प्रकरणी अवघ्या 48 तासांत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. या कारवाईवेळी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजचा मोठा फायदा झाला.

हैदराबाद पोलीस येणार अडचणीत, महाराष्ट्रातील प्रकरणाचा दाखला देत न्यायालयाने विचारला प्रश्न

सीसीटीव्हीमध्ये एक ट्रग वेगात टोलनाक्याजवळून जाताना दिसत आहे. आरोपींनी याच ट्रकमधून बलात्कारानंतर तरुणीचा मृतदेह नेला, असा दावा करण्यात येत आहे. आरोपींनी आधी तरुणीच्या स्कुटीची विल्हेवाट लावली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला. टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेच आरोपींपर्यंत पोहोचणं शक्य झालं, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

चारही आरोपींचा एन्काऊंटरमध्ये खात्मा

हैदराबादच्या हद्दीत शमशाबाद इथे 26 वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि खून करण्यात सामील असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी सकाळी सायबराबाद पोलिसांनी एका चकमकीत ठार केलं. पोलिसांच्या अहवालानुसार, मोहम्मद अली उर्फ मोहम्मद आरिफ, जोल्लू शिवा, जोल्लू नवीन कुमार, आणि चिंताकुंता चेन्ना केशवुलू या चार आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करून चौघांनी ठार मारलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 01:48 PM IST

ताज्या बातम्या