हैदराबाद ENCOUNTER : आरोपीची पत्नी म्हणाली, 'जिथे त्याला संपवलं, तिथेच मलाही मारा'

हैदराबाद ENCOUNTER : आरोपीची पत्नी म्हणाली, 'जिथे त्याला संपवलं, तिथेच मलाही मारा'

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करून खात्मा करण्यात आला. या घटनेनंतर आरोपींच्या कुटुंबीयांना मोठा हादरा बसला आहे

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करून खात्मा करण्यात आला. या घटनेनंतर आरोपींच्या कुटुंबीयांना मोठा हादरा बसला आहे. मुख्य आरोपी मोहम्मद आरिफच्या आईने 'माझा मुलगा गेला' अशी प्रतिक्रिया दिली. तसंच 'जर माझ्या मुलाने गुन्हा केला असेल तर त्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे होती', असं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

आरोपी चिंताकुंता चेन्ना केशवुलूची पत्नीने संताप व्यक्त केला आहे. 'पोलिसांनी मलाही मारून टाकावे. आता माझा पती मेला असून माझ्याकडे काहीही नाही.' तसंच तीने पत्रकारांशी बोलतांना सांगितलं की, 'मला सांगण्यात आलं होतं की, माझ्या पतीला काहीही होणार नाही. ते परत घरी येतील. मला माहिती नाही पुढे काय होणार होतं. पण, आता मला त्या ठिकाणी घेऊ जा, ज्या ठिकाणी माझ्या पतीला ठार मारलं.'

'त्याचा अंत असा नको होता...'

चिंताकुंता चेन्ना केशवुलूचं नुकतंच लग्न झालं होतं. आरोपी शिवचे वडील म्हणाले की, 'माझ्या मुलाने गुन्हा केला असेल. पण त्याचा अंत असा नको व्हायला होता. अनेक जणांना बलात्कार आणि हत्या केल्यात. पण त्यांना असं मारण्यात आलं नाही. त्यांना असं का नाही मारलं?'

तेलंगाणामधील नारायणपेट जिल्ह्यातील जकलर गावातील 26 वर्षीय आरिफने ट्रक ड्रायव्हर होण्याआधी स्थानिक पेट्रोल पंपावर काम केलं होतं. तर आणखी एक आरोपी जोल्लू शिवा आणि जोल्लू नवीन कुमार हे दोघेही 20 वर्षांचे होते.  दोघेही सफाई कामगार म्हणून काम करत होते आणि ते त्याच जिल्ह्यातील गुडीगंदला गावातील राहणार होते. तर चिंताकुंता चेन्ना केशवुलू (20) हा सुद्धा त्याच गावात राहणारा होता. त्याच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनीच्या आजाराने त्रस्त होता.

चारही आरोपींचं एन्काऊंटर

हैदराबादच्या हद्दीत शमशाबाद इथे 26 वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि खून करण्यात सामील असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी सकाळी सायबराबाद पोलिसांनी एका चकमकीत ठार केलं. पोलिसांच्या अहवालानुसार, मोहम्मद अली उर्फ मोहम्मद आरिफ, जोल्लू शिवा, जोल्लू नवीन कुमार, आणि चिंताकुंता चेन्ना केशवुलू या चार आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करून चौघांनी ठार मारलं.

असं झालं एन्काऊंटर, पोलिसांचा खुलासा

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील  आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी पत्रकार परिषद घेतली. या चारही आरोपींवर का गोळीबार करावा लागला याचा खुलासाही केला. 'आज सकाळी पावणे सहा वाजता चारही आरोपींना आम्ही घटनास्थळी नेलं. त्यांनी अचानक दगड आणि लाठ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. तरी पोलिसांनी धीरानं घेत त्यांना आत्मसमर्पण करायला सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. उलट पोलिसांकडून पिस्तुलं हिसकावून गोळीबार सुरू केला. आता पोलिसांकडे पर्याय उरला नाही आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्या. काही वेळानं त्यांच्याकडून गोळीबार बंद झाला. जेव्हा आम्ही जाऊन तपासलं तेव्हा सर्व 4 आरोपींना गोळ्या लागल्या होत्या आणि ते मृत्युमुखी पडले होते. दोन पोलीसही यात जखमी झाले, पण गोळीबारामुळे नाही तर दगड लागल्यामुळे, असं सज्जनार म्हणाले.

एन्काऊंटरचा घटनाक्रम

पहाटे घडलं हैदराबाद एन्काऊंटर

चौघा आरोपींना पोलिसांनी केलं ठार

आरोपींना होती 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

चौकशी करण्यासाठी तुरुंगातून घटनास्थळी नेलं

आरोपींनी अनेक गोष्टी उघड केल्या

'दिशा'चा मोबाईल कुठे आहे, याची माहिती दिली

घटनास्थळी चौकशीदरम्यान दिशाभूल करण्याचा प्रयत्न

चौघांकडून पोलिसांवर दगडफेक

घटनास्थळावरच्या काठ्या पोलिसांवर फेकल्या

दोघा आरोपींनी पोलिसांची शस्त्रं हिसकावली

आरोपींनी पोलिसांवर केला गोळीबार

आत्मसमर्पणाच्या सूचना करूनही जुमानलं नाही

अखेर पोलिसांचा प्रत्युतरादाखल गोळीबार

चौघांपैकी दोघा आरोपींकडे सापडली शस्त्रं

एन्काऊंटरमध्ये 2 पोलीस अधिकारी जखमी

सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांचा अल्पपरिचय

- 1996 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी

- मार्च 2018 मध्ये सायबराबादचे पोलीस आयुक्त

- एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून आंध्र प्रदेश, तेलंगणात ओळख

- वारंगलमधील इंजिनीअरिंगच्या तरुणीवरील अॅसिड हल्ल्यातील 3 आरोपींचा एन्काऊंटर

- वारंगल एन्काऊंटरनंतर सज्जनार प्रकाशझोतात

-  वारंगलमधील एन्काऊंटरवरुन मोठा वाद उफाळला, नागरिकांचा प्रचंड पाठिंबा

First published: December 6, 2019, 9:20 PM IST
Tags: Rape

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading