हैदराबाद बलात्कार प्रकरण; आरोपीची पत्नी म्हणते 10 लाख आणि नोकरी द्या

हैदराबाद बलात्कार प्रकरण; आरोपीची पत्नी म्हणते 10 लाख आणि नोकरी द्या

'माझा पती तर आता मारला गेलाय. तो काही परत येणार नाही. मात्र माझ्या मुलाला मी कसं सांभाळणार त्यामुळे सरकारने ही मदत करावी.'

  • Share this:

हैदराबाद 14 डिसेंबर : हैदराबाद बलात्कार प्रकरण देशभर गाजलं आणि त्यानंतर झालेल्या एन्काउंटरमुळे देशभर वादळ निर्माण झालं. या एन्काउंटरची चौकशी आता सुप्रीम कोर्टाची समिती आणि तेलंगणा पोलिसांची खास SIT करत आहे. या प्रकरणावरून देशभर रणकंदन माजलं असताना सुप्रीम कोर्टाने सर्वआरोपींचे शव जतन करण्यास सांगितले आहेत. त्यामुळे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलेले नाहीत. आत त्यातल्या एका आरोपीच्या पत्नीने सरकारकडे नोकरी आणि 10 लाखांची मदत मागतलीय.  या प्रकरणातला एक आरोपी चिन्नाकेशवुलूची पत्नी गर्भवती असून तिने सरकारकडे ही मागणी केलीय. ती म्हणाले, माझा पती तर आता मारला गेलाय. तो काही परत येणार नाही. मात्र माझ्या मुलाला मी कसं सांभाळणार त्यामुळे सरकारने ही मदत करावी असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

CAB विरोधात भडका, पश्चिम बंगालमध्ये लोकांनी पेटवली ट्रेन

तेलंगणा राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीला विरोध केला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं चौकशीसंदर्भातील आक्षेप नाकारला आहे. चार बलात्कारी आरोपींना ठार मारण्याच्या कारणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने चौकशी आयोग स्थापन केला. सुप्रीम कोर्टातील माजी न्यायमूर्ती व्ही एस शिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करून आगामी सहा महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रेखा प्रकाश बाल्डोटा आणि सीबीआयचे माजी प्रमुख कार्तिकीयन हे अन्य सदस्य असतील अशी माहिती मिळत आहे

तेलंगनाची राजधानी हैदराबादमध्ये पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. एका रिक्षा चालकाने 18 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना 8 डिसेंबरला घडली होती. त्याआधी दोन दिवस हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. त्यानंतर झालेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

सावरकरांच्या टीकेवरून भाजपचा राहुल गांधींवर सर्वात मोठा पलटवार

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत आजीच्या घरी जात असताना हा प्रकार घ़डला होता. त्यावेळी रस्ता विसरल्यानंतर आरोपीच्या भावाने त्या दोन मुलींना पाहिलं. रिक्षाचालक असलेल्या आरोपीच्या भावाने त्या दोन्ही मुलींना घेऊन स्वत:च्या घरी पोहोचला. तेव्हा त्याच्या आईने मुलींना घरी सोडण्यासाठी लहान भावाला पाठवलं. तेव्हा त्याने मुलींना घरी घेऊन न जाता परिसरातील एका लॉजवर नेलं. लहान मुलगी झोपताच मोठ्या बहिणीवर नराधमाने बलात्कार केला. त्यानंतर रेल्वे स्थानकावर त्या दोघींना सोडून तो फरार झाला. त्यानंतर पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना फोन केला. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार अरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 14, 2019, 9:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading