हैदराबाद Encounter: खळबळजनक खुलासा, आरोपींनी आधीही 9 महिलांना बलात्कार करून जाळलं

हैदराबाद Encounter: खळबळजनक खुलासा, आरोपींनी आधीही 9 महिलांना बलात्कार करून जाळलं

या प्रकरणातले आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि महिलांवर अत्याचार करणारे होते त्यांनी जे केलं ते मानवतेच्या विरुद्ध आहे. त्यांना त्याची सवयच लागली होती.

  • Share this:

हैदराबाद 18 डिसेंबर : हैदराबाद बलात्कार प्रकरणी दररोज नवे खुलासे होत आहेत. महिला डॉक्टरवर काही नराधमांनी बलात्कार करून तिला जाळलं होतं. त्यानंतर देशभर असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर काही दिवसांमध्येच पोलिसांनी एन्काउंटर करून त्या सर्व आरोपींना ठार केलं होतं. त्यात घटनेतले सर्व चारही आरोपी ठार झाले होते. या घटनेमुळे देशभर प्रचंड वादळ निर्माण झालं. आणि एन्काउंटरवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालं. या प्रकरणाची आता सुप्रीम कोर्टाने नेमलेली समिती आणि तेलंगणा सरकारने स्थापन केलेली खास SIT चौकशी करत आहे. या प्रकरणातले आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि महिलांवर अत्याचार करणारे होते त्यांनी जे केलं ते मानवतेच्या विरुद्ध आहे. त्यांनी अशाच प्रकारे 9 महिलांची हत्या केली असा दावा तेलंगणा पोलिसांनी केलाय.

राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? नागपुरात दाखल झालेल्या एकनाथ खडसेंनी दिलं उत्तर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते त्यातल्या दोन आरोपींनी अशाच प्रकारे 9 महिलांवर अत्याचार करून त्यांना जाळून हत्या केली असा दावा केलाय. या आरोपींनीच तशी कबूली दिली असंही पोलिसांनी सांगितलंय. या आरोपींनी यातल्या काही घटना कर्नाटक सीमेवर झाला असल्याचं सांगितलं होतं.

त्यामुळे पोलिसांनी आता त्या पीडीत महिलांची माहिती मिळवणं सुरू केलंय. तेलंगानातल्या संगा रेड्डी, रंगा रेड्डी आणि मेहबूबनगर हाइवे आणि कर्नाटकातल्या सीमावर्ती शहरांमध्ये या घटना घडल्या असून पोलिसांनी या घटनांचा शोध घेण्यासाठी खास पथकं स्थापन केली आहेत.

इतर बातम्या - संगमनेरमध्ये कापसाचा टेम्पो ओढ्यात पलटला, 3 तरुणांचा जागीच मृत्यू

काय झालं होतं त्या रात्री ?

हैदराबादच्या सायबरबाद टोल प्लाझाजवळ महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या करण्यात आली, त्यानंतर मृतदेह पेट्रोलने पेटवून उड्डाणपुलाखाली फेकण्यात आला. मोहम्मद पाशा, नवीन, चिंताकांत केशवुलू आणि शिवा अशी 4 आरोपींची नावं होती.

अशा प्रकारे झाला एन्काऊंटर

तेलंगणा पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींनी शस्त्र हिसकावल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सायबराबादचे पोलिस आयुक्त सी.व्ही. सज्जनार म्हणाले की, मोहम्मद आरिफ या आरोपींपैकी एकाने प्रथम गोळी झाडली होती. यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि चकमकीत चारही आरोपी ठार झाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 18, 2019, 2:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading