धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून इंजिनिअर जावयाला खुर्चीला बांधून जिवंत जाळलं

धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून इंजिनिअर जावयाला खुर्चीला बांधून जिवंत जाळलं

पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पत्नीनं जावयला जिवंत जाळलं, मंदिरात घडला धक्कादायक प्रकार.

  • Share this:

तेलंगणा, 25 नोव्हेंबर : अंधश्रद्धेला बळी पडल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो, वाचतो आणि मात्र 20व्या दशकातही जादूटोणा केल्याच्या संशयावरून तेलंगणात एक धक्कादायक प्रकार घडला. येथील बळवंत नगर जिल्ह्यातील जगतीलाल गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला त्याच्या दूरच्या नातेवाईकांनी जिवंत जाळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथे राहणारा पवन कुमार हा इंजिनिअर असून त्याला खुर्चीवर बांधण्यात आले. त्यानंतर त्याला जिवंत जाळण्यात आले. पवन कुमारला त्याच्या चुलत भावाच्या घरी खोटं सांगून घेऊन जाण्यात आले, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. पवन कुमार बंगळुरूतील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता.

वाचा-महाराष्ट्र हादरला, बीडमध्ये पाटबंधारे विभागात पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

या प्रकरणात जगनची पत्नी आणि भावाला अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या दोघांची कसून चौकशी करत आहेत. या घटनेत किती लोकांचा सहभाग आहे, याचा शोध सध्या घेतला जात आहे.

वाचा-स्वत:च घर केलं उद्ध्वस्त;पत्नी मग दोन मुलांना गळा दाबून संपवलं,त्यानंतर मात्र...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परस्पर वाद झाल्यावर पवननं काही महिन्यांपूर्वी जगनला जिवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, 12 दिवसांपूर्वी जगनचा हदयविकाराचा तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. मात्र पवननं जादूटोणा करून जगनला मारल्याच्या त्य़ाच्या पत्नीचा संशय होता. आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जगनच्या पत्नीनं पवनला घरी बोलवलं. कुटुंबियांचं सांत्वन करण्याच्या उद्देशानं पवन जगनच्या घरी गेला. त्यानंतर त्याला मंदिरात घेऊन गेले आणि जगनच्या पत्नीनं त्याला खुर्चीवर बांधले, पवनला जिवंत जाळण्यात आले.

वाचा-स्वत:च घर केलं उद्ध्वस्त;पत्नी मग दोन मुलांना गळा दाबून संपवलं,त्यानंतर मात्र...

सायंकाळी, स्थानिकांनी किंचाळण्याचा आवाज ऐकून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मंदिराचे दार बंद करण्यात आले आहेत. जेव्हा स्थानिकांनी टाळं तोडून मंदिरात प्रवेश केला, तेव्हा पवन कुमारचा मृतदेह खुर्चीवर जळलेल्या अवस्थेता दिसला. पोलीस सध्या या प्रकरणात कोणा-कोणाचा सहभाग होता, याचा शोध घेत आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: November 25, 2020, 10:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या