VIDEO : हैदराबाद Encounter वर सरन्यायाधीशांचं मोठं विधान!

VIDEO : हैदराबाद Encounter वर सरन्यायाधीशांचं मोठं विधान!

Instant न्याय मिळणं शक्य नाही. तसा तो दिला जाता कामा नये, असं सांगताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी हैदराबाद Encounter प्रकरणी भाष्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले.. पाहा VIDEO

  • Share this:

जोधपूर (राजस्थान), 7 डिसेंबर : हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळणारे नराधम तेलंगण पोलिसांच्या चकमकीत मारले गेले. त्यावर देशभरातून पोलिसांचं अभिनंदन होत आहे. काहींनी अशा प्रकारे कायदा हातात घेत झटपट न्याय देण्याचा काही थरातून विरोध होत आहे. या प्रकरणात भारताच्या सरन्यायाधीशांची भूमिका काय याविषयी औत्सुक्य होतं. जोधपूरच्या एका कार्यक्रमात त्यांनी यावर जाहीरपणे भाष्य केलं. "न्यायाचं रुपांतर सुडात होता कामा नये. बदला घेण्यासाठी किंवा सूड म्हणून न्याय दिला जातो, तेव्हा न्यायाचं स्वरूप भ्रष्ट होतं, असं मला वाटतं", असं न्यायमूर्ती बोबडे म्हणाले.

न्या. शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. ते जोधपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हैदराबाद घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यायव्यवस्थेविषयी सूचक भाष्य केलं. न्या. शरद बोबडे म्हणाले, "न्यायप्रक्रियेतला विलंब टाळण्यासाठी आणि गुन्हेगारीची प्रकरणं लवकर निपटण्यासाठी न्यायव्यवस्थेत फेरबदल करणं गरजेचं आहे, यात शंका नाही. पणै याचा अर्थ न्याय तातडीने द्यायचा किंवा इन्स्टंट जस्टिस शक्य नाही. किंवा तसा तातडीचा न्याय असूनही नये, असं माझं मत आहे."

दरम्यान, देशभर गाजत असलेल्या हैदराबाद ENCOUNTER प्रकरणाविरुद्ध तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे पोलिसांना आता सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. प्रकरणाची पुढची सुनावणी ही 9 डिसेंबरला होणार असून तोपर्यंत आरोपींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणार करू नका असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

--------------------

अन्य बातम्या

हैदराबाद ENCOUNTER : आरोपीची पत्नी म्हणाली, 'जिथे त्याला संपवलं, तिथेच मलाही मार

SPECIAL REPORT : हैदराबाद ENCOUNTER मुळे नव्या वादाला सुरूवात!

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण; पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या गुन्हेगाराने स्वतःच घेतली दया याचिका मागे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 04:58 PM IST

ताज्या बातम्या